आपल्या सर्वांनाच लहानपणापासून झाडांमुळे ऑक्सिजन मिळतो हे शिकवलं जातं. ते खरंही आहे. मात्र तुम्हाला आतापर्यंत मिळालेली माहिती अर्धसत्य आहे असं म्हंटलं तर चुकीचं ठरणार नाही.
आपल्याला लहानपणापासूनच सांगितलं जातं, शिकवलं जातं की झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात. सर्वसाधारणपणे झाडं दिवसा ऑक्सिजन आणि रात्री कार्बनडायऑक्साइड सोडतात. मात्र याचा अर्थ असा नाही की झाडांशिवाय ऑक्सिजन मिळतच नाही. नॅशनल जिओग्राफिक ने याबाबत एक महत्त्वाचा रिसर्च केला आहे. आणि या रिसर्चमधून अत्यंत रंजक माहिती समोर आलेली आहे. नॅशनल जिओग्राफिकच्या मते जमिनीवरील झाडांपासून आपल्याला केवळ 25 ते 30 टक्के ऑक्सिजन मिळतो.
70 टक्के ऑक्सिजन येतो कुठून ?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की उरलेला 70% ऑक्सिजन येतो कुठून? तर जाणून घेऊयात याचं उत्तर. पृथ्वीवरील महासागरांनी 71टक्के पृष्ठभाग व्यापला आहे. पृथ्वीवरील 70 टक्के ऑक्सिजन हा आपल्याला चक्क समुद्रातून मिळतो. समुद्रातल्या फायटोप्लँक्टन पासून ऑक्सिजन तयार होतो. फायटोप्लँक्टन म्हणजे एका विशीष्ट प्रकारचं शेवाळं. ही लहान शेवाळं मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन तयार करतात. महत्त्वाची बाब म्हणेज महासागरं आपल्या वातावरणातील कार्बनडायऑक्साईड देखील शोषून घेतात.
फायटोप्लँक्टन म्हणजे काय?
फायटोप्लँक्टन हे विशिष्ट प्रकारचं सूक्ष्म सागरी शेवाळं आहे. हे समुद्रामधील जीवनसाथी अन्न उरवठ्याचं देखील काम करतं. हे शेवाळं देखील इतर वनस्पतींसारखीच असतात. मात्र यामध्ये क्लोरोफिल देवल आढळून येतं. या शेवाळाला वाढीसाठी सूर्यप्रकाशाची गरज भासते. जिथं समुद्राचा प्रकाश पडतो तिथे फायटोप्लँक्टन हे शेवाळं समुद्राच्या वरच्या भागात तरंगतात. फायटोप्लँक्टनला नायट्रेट्स, फॉस्फेट्स आणि सल्फर यासारख्या अजैविक तत्वांची देखील आवश्यकता भासते.
तुम्हाला ही इंटरेस्टिंग, माहिती याआधी माहित होती का? त्यामुळे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला याबाबत काय वाटतं, कमेंटमध्ये कळवा.