What is Deja Vu: आपल्या मनाचे असंख्य खेळ असतात. कधी ते आपल्याला खरे वाटतात तर कधी खोटे. आपल्या मनाचे भासही अधिक (Mental Illusion) आहेत परंतु एक भावना तुम्हाला आम्हाला सारखी जाणवत असेल ती म्हणजे देजा वू ही. आता तुम्ही म्हणाल याचा अर्थ काय, तर हो, आम्ही तुम्हाला आज याचविषयी थोडी माहिती (Deja Vu Meaning) करू देणार आहोत. तुम्ही एखाद्या प्रसंगात जीवन जगत असाल किंवा तुमच्या आयुष्यात अमुक एखादा प्रसंग घडत असेल तर तुम्हालाही असे वाटू लागते की अरे हा प्रसंग तर माझ्यासोबत याआधीही घडला आहे. तो प्रसंग, त्याच व्यक्ती, तिची एक्शन, तोच आविर्भाव, त्याच हालचाल आणि तेच संवाद... अरे हे जसच्या तसं माझ्या आयुष्यात तर या आधी घडून गेले आहे मग (Hallucinations) हे परत का घडतंय? असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. (interesting facts of Life what is deja vu and the scientic logic behind it)
तर होय. या प्रकाराला देजा वू असं म्हटले जाते. पुर्वी ज्यांच्यासोबत हा प्रकार पहिल्यांदा घडला असेल तर त्या व्यक्तींना हा प्रकार फक्त आपल्यासोबतच (Science Behind Deja Vu) झालाय की काय असे वाटू शकते. परंतु नंतर इतरांशी चर्चा केल्यानंतर तुम्हालाही वाटेल की, अरे हे फक्त माझ्यासोबतच नाही तर इतरांसोबतही घडलं आहे. तर तुम्ही बरोबर आहात. हा प्रकार आपल्यापैंकी अनेकांसोबत होतो. परंतु यामागे एक शास्त्रीय कारणं आहे आणि आज आपण ते काय याविषयी थोडं जाणून घेऊया,
आपल्या मेंदूत टेंपोरल लोब नावाचा एक प्रकार असतो. हा भाग तुमच्या शॉर्ट टर्म मेमरीवर काम करतो. लोबमध्ये मेंदूतील विद्यूत संकेतांमध्ये बदल होतो आणि देजा वू ही प्रक्रिया घडते.
आपलं मेंदू हे एक अजब यंत्र आहे. आपला मेंदू आणि आपली स्मरणशक्ती हे सर्व काही लक्षात ठेवत असते मग त्यात परिस्थितींचा आणि घटनांचाही समावेश असतो. आपला मेंदू याचे संकेत पुन्हा देऊ लागतो आणि त्याचा संबंध वर्तमानाशी लागतो.
या प्रकारावर अनेक तर्कवितर्क लावले गेले आहे. याचा संबंध आपल्या मागच्या जन्माशी आहे का, असाही प्रश्न आहे परंतु यावर अद्याप काही ठोस पुरावा नाही त्यातून यावर मोठ्या प्रमाणात अद्यापही संशोधन सुरू आहे.