America Rushes Warships To Aid Ally nation : पश्चिम आशियामध्ये तणाव वाढत असल्याने पुढील सूचना येईपर्यंत इराण किंवा इस्रायलला जाऊ नये, असा सल्ला परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) भारतीय नागरिकांना दिला आहे. इस्रायलच्या हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी इराणने दिली असून, त्यातून संघर्षाचा भडका (Iran Israel War) आणखी तीव्र होण्याची भीती आहे. त्यामुळे आता पश्चिम आशियामधील संघर्ष अधिक ताणला जाण्याची शक्यता आहे. अशातच आता अमेरिकने (America) मित्र राष्ट्रांना म्हणजेच इस्त्राईलला मदत करण्यासाठी मैदानात उतरली आहे. अशातच आता अमेरिकन नौदल इस्त्राईलच्या मदतीसाठी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिकेने थोपटले दंड
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी इस्त्राईलला संपूर्ण पाठिंबा देण्याबाबत स्पष्ट मत मांडलं आहे. अमेरिकेने इस्रायल आणि अमेरिकन सैन्याच्या संरक्षणासाठी अतिरिक्त लष्करी मालमत्ता पाठवली आहे. तसेच अमेरिकेची दोन विध्वंसक जहाजे पूर्व भूमध्य समुद्रात पाठवण्यात आली आहेत, अशी माहिती नौदलाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. हुथी ड्रोन आणि एंटी-शिप मिसाईल देखील रवाना झाल्या आहेत. अमेरिकने दंड थोपटल्यानंतर आता इराणच्या मित्रांनी आता रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे.
आधीच गाझा पट्टीतील युद्धावरून पश्चिम आशियामध्ये तणाव आहे. इस्रायलने एक एप्रिल रोजी इराणच्या सीरियातील वाणिज्य दूतावासावर हल्ला केला. त्यात इराणच्या काही अतिवरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यावरून, इराणकडून संतप्त झाला आहे. इस्त्रायलला या हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर, अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांना पश्चिम आशियात प्रवास न करण्याच्या सूचना केल्या आहेत.
पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, भारतीय नागरिकांनी पुढील सूचना येईपर्यंत इराण किंवा इस्रायलमध्ये जाऊ नये. या दोन्ही देशांतील भारतीयांनी दूतावासाच्या संपर्कात राहावे आणि स्वतःची माहिती नोंदवावी. सुरक्षेच्या दृष्टीने खूप काळजी घ्यावी आणि अत्यावश्यक काम नसल्यास घरातून बाहेर पडणे टाळावे, अशा सुचना परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
नेमकं काय झालं?
'हमास'च्या दहशतवाद्यांनी सात ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केल्यानंतर, इस्रायल आणि 'हमास' यांच्यातील युद्धाला सुरुवात झाली. लेबनॉनमधील 'हिज्बुल्ला 'ही 'हमास'च्या बाजूने उतरली असून, त्यांच्या दहशतवाद्यांकडून इस्रायलवर हल्ले केले आहेत. इराणचा पाठिंबा असणाऱ्या हुती दहशतवाद्यांच्या संघटनेने एडनच्या आखातामध्ये आंतरराष्ट्रीय जहाजांवर हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अमेरिका, भारतासह अनेक देशांचे नौदल प्रयत्नशील आहे. इराणचा 'हमास'ला पाठिंबा असून, गाझा पट्टीतील नागरिकांच्या बळीविरोधात इस्रायलला धडा शिकवण्याचा इशारा इराणने दिला आहे.