काहीही झालं तरी आम्ही भारतात तेल तुटवडा होऊ देणार नाही - इराण

'अन्यथा भारताच्या इतर सवलतीही बंद करु'

Updated: Jul 12, 2018, 02:24 PM IST
काहीही झालं तरी आम्ही भारतात तेल तुटवडा होऊ देणार नाही - इराण title=

नवी दिल्ली : भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमंती हा वादाचा मुद्दा असतो. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले की सरकारवर टीका होण्यास सुरुवात होते. संपूर्ण जगाला पेट्रोल आणि डिझेल पुरवणारे काही मोजकेच देश आहेत. ज्यांच्याकडून पेट्रोल-डिझेल आयात केलं जातं. भारत देथील इराणकडून कच्च तेल आयात करतो. ईरानने म्हटलं आहे की, भारताला तेल पुरवठा करण्यासाठी इराण सर्वकाही करेल. इराण भारताचा विश्वासातील ऊर्जा मित्र देश आहे. इराणच्या राजदूतावासाने स्पष्टीकरण अशा वेळी दिलं जेव्हा त्यांचे उप राजदूत मसूद रिजवानियन रहागी यानी एका दिवसाआधी म्हटलं होतं की, 'अमेरिकेच्या बंदीनंतर जर भारताने इराणकडून तेल आयात करणं कमी केलं तर इराणकडून भारताला मिळणारी सवलत देखील बंद केली जाईल.'

दूतावासाने म्हटलं की, अस्थिर ऊर्जा बाजारात भारताला येत असणाऱ्या अडचणींना आम्ही समजू शकतो. इराण याबाबत भारताला तेल पुरवठा करण्याच्या बाबतीत काही महत्त्वाची पाऊलं उचलून आपलं सर्वश्रेष्ठ देईल. रहागी यांनी बुधवारी म्हटलं की, जर भारताने सऊदी अरब, रशिया, इराक, अमेरिका किंवा इतर देशाकडून तेल आयात करण्याचा प्रयत्न केला तर इराणकडून भारताला मिळणाऱ्या इतर सर्व सवलती बंद केल्या जातील.

एक दिवसाआधीच चाबहार बंदरबाबत इराणने भारताकडे नाराजी व्यक्त केली होती. इराणने आरोप केला आहे की, भारताने दिलेलं वचन तोडलं आहे. भारताने चाबहार बंदर आणि त्याच्या विकासाठी गुंतवणुकीचं आश्वासन दिलं होतं. पण ते अजून पूर्ण केलेलं नाही. जर चाबहार बंदराच्या विकासासाठी भारताकडून मदत नाही मिळाली तर याचा परिणाम संबंधावर आणि भागीदारी होईल. त्यामुळे भारताने यावर लवकर पाऊलं उचलावी.

इराक आणि सऊदी अरबनंतर इराण देखील भारताला तेल पुरवतो. इराणने एप्रिल 2017 ते जानेवारी 2018 पर्यंत भारताला 1.84 कोटी टन कच्चं तेल पुरवलं आहे. इराण आणि अमेरिकेमध्ये अणू करारच्या बाबतीत मतभेद झाल्याने अमेरिकेने भारत आणि इतर देशांना 4 नोव्हेंबरपर्यंत इराणकडून तेल आयात न करण्य़ाचं आवाहन केलं होतं. नाहीतर वस्तूंवर बंदी घालण्याची सूचना अमेरिकने दिली होती. अणू करार रद्द झाल्यानंतर अमेरिकेने आखाती देशावर बंदी टाकली आहे.