WHO टीमच्या वुहान दौऱ्याआधी चीनची नवी खेळी?

कोरोना व्हायरस संबंधी तपासासाठी WHOची टीम पुढच्या आठवड्यात चीनच्या वुहानमध्ये जाणार आहे.

Updated: Jul 8, 2020, 07:20 PM IST
WHO टीमच्या वुहान दौऱ्याआधी चीनची नवी खेळी?

वुहान : कोरोना व्हायरस संबंधी तपासासाठी WHOची टीम पुढच्या आठवड्यात चीनच्या वुहानमध्ये जाणार आहे. पण त्याआधीच चीनने कोरोना व्हायरसबाबतचे पुरावे नष्ट करायला सुरुवात केली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण कोरोना व्हायरसचं केंद्र असलेल्या वुहान शहरामध्ये पूर आला आहे, त्यामुळे तिथलं जनजीवन ठप्प झालं आहे. पूर परिस्थितीमुळे नागरिकांना घरामध्येच राहायला सांगण्यात आलं आहे. 

वुहान शहरामध्ये आलेल्या पुरात आत्तापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. येत्या काही दिवसात इथली परिस्थिती आणखी खराब होऊ शकते. पुढचे ३१ दिवस या भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दुसरीकडे कोरोना व्हायरसचे पुरावे नष्ट करण्यासाठी चीनने ही खेळी केल्याचा आरोपही केला जात आहे. 

कोरोना: WHO की टीम के दौरे से पहले, वुहान से सबूत मिटाने के लिए चीन ने चली यह चाल!

वुहानपासून ३६८ किमी लांब असलेल्या यिलिंग जिल्ह्यातल्या थ्री गोरजेस डॅममधून पाणी सोडलं जात असल्याचं वृत्त देण्यात आलं आहे. हा डॅम फुटण्याच्या स्थितीमध्ये असल्यामुळे पाणी सोडण्यात येत असल्याचं चीनमधल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. पण हे पाणी मुद्दाम सोडलं जात असल्याचा आरोप चीनमधल्या नागरिकांनी केला आहे.

चीनमधले सामाजिक कार्यकर्ते जेनिफर जेंग यांनी केलेल्या दाव्यानुसार, 'हे पाऊल जाणूनबुजून उचलण्यात आलं आहे. कोरोनाबद्दलची चीनची भूमिका आणि पुरावे नष्ट करण्यासाठी ही चीनची रणनिती आहे.'

पुढच्या आठवड्यात WHOची एक टीम वुहानला जाणार आहे. कोरोना व्हायरस जनावरांमधून माणसांमध्ये कसा पोहोचला, याचा तपास WHOची टीम करणार आहे. त्यामुळेच चीनने पुरावे नष्ट करण्यासाठी पूर आणल्याचा आरोप केला जातोय.