आयसिसनं घेतली लंडन दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी

लंडनमधल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी आयसिसनं घेतली आहे. या हल्ल्यात सातजणांना जीव गमवला तर 48 जण जखमी झालेत.

Updated: Jun 5, 2017, 04:01 PM IST
आयसिसनं घेतली लंडन दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी title=

लंडन : लंडनमधल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी आयसिसनं घेतली आहे. या हल्ल्यात सातजणांना जीव गमवला तर 48 जण जखमी झालेत. लंडन ब्रीजवरुन चालणा-या पादचा-यांना एका व्हॅन चालकाने उडवलं. धिस इज फॉर अल्ल्हा असं हा व्हॅन चालक या घटनेदरम्यान ओरडत असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय.

व्हॅनच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. दुसरा हल्ला बॉरो मार्केटमध्ये घडला. एका रेस्टॉरन्टमध्ये एका व्यक्तीने लोकांवर चाकू हल्ला केला. या ठिकाणी पोलिसांनी तीन हल्लेखोरांना जागीच कंठस्नान घातलं. तसेच, या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही खबरदारीची उपायही करण्यात आले आहेत.

दरम्यान, इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा विभागाच्या अधिका-यांची आपत्कालीन बैठक बोलावली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर ट्विट करुन इंग्लंडला मदत करण्याची तयारी दर्शविली आहे.