Iran Isfahan City Attacked by Iran: इस्रायल आणि इराणमधील संघर्षामध्ये नवी ठिणगी पडली आहे. चार दिवसांपूर्वीच इस्रायलवर इराणने तब्बल 200 क्षेपणास्रं डागली. त्यानंतर इराणणने थेट इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणला इशारा दिला होता. थेट बदला घेण्याचा उल्लेख करत तुम्हाला सोडणार नाही आम्ही तुम्हाला तशास तसं उत्तर देऊ असा इशारा इराणला इस्रायलकडून देण्यात आला होता. याच इशाऱ्यानंतर 4 दिवसांनी इस्रायलने इराणवर हल्ला केला आहे. आज इराणच्या अनेक शहरांवर इस्रायलने क्षेपणास्त्र डागली. बऱ्याच ठिकाणी ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे इस्रायलने इराणमधील अण्विक केंद्र म्हणजेच न्यूक्लिअर सेंटरवरही क्षेपणास्त्रं डागली आहेत. एकूण 3 क्षेपणास्रं अण्विक केंद्रावर डागण्यात आली आल्याची बातमी वृत्तसंस्थांनी दिली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर इराणने आपल्या एअरफोर्सला अलर्ट केलं आहे. आपली एअर डिफेन्स यंत्रणा इराणने सक्रीय केली असून देशातील इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स या विशेष तुकड्यांना सर्व लष्करी तळांवर सक्रीय राहण्यास सांगण्यात आलं आहे.
इराणमधील सरकारी वृत्तसंस्थेनं आज पहाटेच्या सुमारास इस्रायलकडून हा हल्ला करण्यात आल्याचं म्हटलं आहे. इस्फहान शहरामधील विमानतळावर इराणकडून क्षेपणास्त्र डागड्यात आले. पहाटेच्या वेळी अचानक या विमानतळावर स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने एकच खळबळ उडाली. याच शहरामध्ये इराणला अण्विक प्रकल्प असून सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत संवेदनशील शहर आहे. याच शहरामध्ये इराणचा सर्वात मोठा युरेनियम साठा आणि अण्विक प्रकल्प आहे. या हल्ल्यानंतर इस्फहानमधील सर्व विमान उड्डाणे दुसऱ्या विमानतळांवर वळवण्यात आली आहे. दरम्यान इराणवर करण्यात आलेल्या या हवाई हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता अमेरिकेने व्यक्त केली आहे.
सीरियामधील इराणच्या दूतावासावर इस्रायलने 1 एप्रिल रोजी एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यामध्ये इराणी लष्करामधील 2 वरिष्ठ कमांडर्ससहीत 13 जणांनी प्राण गमावले. इराण इस्रायलमध्ये विद्रोह करणाऱ्या हमासच्या गटाला पाठिंबा देत असल्याचा दावा करत इस्रायलने हल्ला केल्याचं सांगण्यात आलं. इस्रायलने या हल्ल्याची जबाबदारी थेट स्वीकारली नाही. मात्र सदर हल्ल्यात मरण पावलेल्यांमध्ये इराणमधील प्रमुख लष्करी अधिकाऱ्यांपैकी एक असलेल्या ब्रिगेडियर जनरल मोहम्म रजा जहादींचा समावेश होता. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर इराण चांगलाच खवळला आणि इस्रायलला परिणामांना समोरे जाण्यासाठी तयार राहा असा इशारा दिला.
नक्की वाचा >> इस्रायल-इराण युद्धामुळे गडबडणार मंथली बजेट? जाणून घ्या तुमच्यावर नेमका कसा होणार परिणाम
इराणने इस्रायलवर 14 एप्रिल रोजी 200 हून अधिक क्षेपणास्त्रं डागली. इस्रायलच्या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणांनी यापैकी बरीच क्षेपणास्रं निष्क्रीय केल्याचा दावा केला. मात्र इराणने हा हल्ला यशस्वी झाल्याचं म्हटलं. याच हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आज म्हणजेच 19 एप्रिल रोजी हवाई हल्ला करत कावाई केल्याचं सांगितलं जात आहे.