Giorgia Meloni Shares Video with Modi: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनी एक्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबतचा (Narendra Modi) व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी #Melody हॅशटॅग वापरला आहे. शेअर केल्यानंतर काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Viedeo) झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-7 शिखर परिषदेसाठी अपुलिया येथे पोहोचले होते. यावेळी जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांचं स्वागत केलं होतं. शिखर परिषदेला उपस्थिती लावल्यानंतर नरेंद्र मोदी आता मायदेशी येण्यासाठी निघाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी जी-7 शिखर परिषदेसाठी दाखल झाले होते. यावेळी जॉर्जिया मेलोनी नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी हजर होत्या. भारतीय पद्धतीने नमस्ते करत त्यांनी स्वागत केलं होतं. नरेंद्र मोदींनीही नमस्कार करत त्यांच्याशी औपचारिक गप्पा मारल्या होत्या. यानंतर जॉर्जिया मेलोनी यांचा नरेंद्र मोदींसोबत सेल्फी काढतानाचा फोटो समोर आला होता. हा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
Hi friends, from #Melodi pic.twitter.com/OslCnWlB86
— Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) June 15, 2024
दरम्यान आज जॉर्जिया मेलोनी यांनी नरेंद्र मोदीसोबत काढलेला सेल्फी व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जॉर्जिया मेलोनी म्हणत आहेत की, 'हॅलो फ्रॉम मेलोडी टीम'. दोघेही व्हिडीओत खळखळून हसताना दिसत आहेत. हा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. शेअर केल्यानंतर तासाभरातच त्याला 1.9 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
Had a very good meeting with PM @GiorgiaMeloni. Thanked her for inviting India to be a part of the G7 Summit and for the wonderful arrangements. We discussed ways to further cement India-Italy relations in areas like commerce, energy, defence, telecom and more. Our nations will… pic.twitter.com/PAe6sdNRO9
— Narendra Modi (@narendramodi) June 14, 2024
जी-7 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रॉन, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमीर झेलेन्स्की यांचीही भेट घेतली.