टोकिओ : आजाराशी लढा देणाऱ्या जपानच्या पंतप्रधान शिंजो आबे यांनी अखेर आज पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. गेल्या काही महिन्यांपासून ते आतड्यांच्या विकाराने त्रस्त आहेत. उपचारासाठी त्यांना आठवडाभरात दोनदा रुग्णालयात दाखल व्हावं लागले. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने अखेर त्यांनी पदाचा त्याग केला आहे.
आपली जबाबदारी पार पाडण्यास सक्षम नसल्याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागीतली आहे. ठरवलेली उद्दिष्ट पूर्ण करण्यापूर्वीच राजीनामा द्यावा लागत असल्याने मनाला प्रचंड वेदना होत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. सलग साडेसात वर्ष जपानचे पंतप्रधानपद भूषणवण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.
Japan's Prime Minister Shinzo Abe resigns
Read @ANI Story | https://t.co/7frvfrxk1W pic.twitter.com/4BfZXbbIsN
— ANI Digital (@ani_digital) August 28, 2020
जपानचे सर्वात प्रदीर्घ काळ काम करणारे पंतप्रधान शिंजो आबे यांनी शुक्रवारी सांगितले की, माझ्या बिघडलेल्या आरोग्यामुळे आपण राजीनामा देत आहात आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून त्यानी अर्थव्यवस्था वाढीस पुनरुज्जीवित करण्याचा आणि तिला अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न केला. मी जर लोकांसाठी सर्वोत्तम निर्णय घेऊ शकत नाही तर मी पंतप्रधान पदावर राहू शकत नाही. मी माझ्या पदावरून बाजुला होण्याचा निर्णय घेतला आहे.
आबे यांनी अनेक वर्षांपासून या आजाराच्या आजारावर प्रतिकार केला आहे आणि एका आठवड्यात हॉस्पिटलच्या दोन भेटींनंतर त्यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये सत्ताधारी पक्षाचा कार्यकाळ संपेपर्यंत आपण या पदावर राहू शकतो का, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आपली बाजू मांडली. प्रकृतिच्या कारणामुळे मी हे पद संभाळू शकत नाही, असे आबे यांनी म्हटले आहे.
राजीनाम्याची बातमीनंतर शेअर बाजारात चढउतार पाहायला मिळत आहे. या राजीनाम्यामुळे सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) दोन किंवा तीन आठवड्यांत नेतृत्वाबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नवीन पंतप्रधान कोण होणार याची उत्सुकता आहे. दरम्यान, जपानमधील कोरोनाव्हायरस प्रादुर्भावामुळे जपान संघर्ष करीत आहे.