भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी रचला इतिहास, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष होणार

कमला हॅरिस या उपराष्ट्रपतीपदी विराजमान होणार आहेत

Updated: Nov 7, 2020, 11:20 PM IST
भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी रचला इतिहास, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष होणार title=

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला असून जो बायडेन यांचा विजय झाला आहे. ते अमेरिकेचे नवे अध्यक्ष बनणार आहेत. त्याचबरोबर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या उपराष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. कमला हॅरीस यांनी इतिहास रचला आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदापर्यंत पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. उपराष्ट्राध्यक्ष होणाऱ्या कमला हॅरिस या पहिल्या कृष्णवर्णीय महिला नेत्या आहेत. अमेरिकेतील या मोठ्या पदावर भारतीय वंशाच्या एखाद्या स्त्रीची नेमणूक होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कमला हॅरिस यांनी अमेरिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर आपला बायो बदलला आहे, ज्यावर त्यांनी स्वत:ला अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हटले आहे. यासह त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, ही निवडणूक जो बिडेन आणि माझ्यासाठी खूप अर्थपूर्ण आहे. ही अमेरिकेची आत्मा आणि त्यासाठी संघर्ष करण्याची आमची तयारी आहे. आपल्यालापुढे खूप काम करायचे आहे. चला सुरू करुया.'

कमला हॅरिस यांचा जन्म ऑकलँडमध्ये 1964 मध्ये झाला होता. त्यांच्या आईचे नाव श्यामला गोपालन आणि वडिलांचे नाव डोनाल्ड हॅरिस होते. त्याचे वडील कर्करोगाचे शास्त्रज्ञ होते जे जमैकाचे राहणारे होते. कमला हॅरिस यांनी 1998 साली ब्राऊन युनिव्हर्सिटीमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

विशेष म्हणजे अमेरिकेत उपराष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळालेल्या त्या भारतीय वंशाच्या पहिल्या अमेरिकन आहेत. अमेरिकेत इतकं मोठं पद मिळवण्याच्या त्या पहिल्या महिला आहेत.