कोरोनामध्ये नोकरी गेली, पण सोशल मीडियाने 21 वर्षांच्या 'या' तरुणाला स्टार बनवलं

नोकरी गेल्यानंतर खबाने लेम समोर मोठा प्रश्न होता. तो इटलीमध्ये राहातो. 2020 मध्ये लागलेल्या लॉकडाऊनमध्ये त्याची नोकरी गेली. 

Updated: Aug 15, 2021, 08:14 PM IST
कोरोनामध्ये नोकरी गेली, पण सोशल मीडियाने 21 वर्षांच्या 'या' तरुणाला स्टार बनवलं title=

इटली: गेल्या काही दिवसांपासून तुम्ही या तरुणाचे व्हिडीओ किंवा मीम्स देखील पाहिले असतील. आयपीएल दरम्यान सर्वात जास्त ह्याचे मीम्स हिट झाले. कोरोना आणि लॉकडाऊन दरम्यान अनेकांची नोकरी गेली. छोटे व्यवसाय बंद पडले आणि बेरोजगारीची वेळ आली. याच दरम्यान 21 वर्षांच्या खबाने लेमचीही नोकरी गेली. आता करायचं काय? जगायचं कसं असा त्याच्या डोळ्यासमोर मोठा प्रश्न होता. 

नोकरी गेल्यानंतर खबाने लेम समोर मोठा प्रश्न होता. तो इटलीमध्ये राहातो. 2020 मध्ये लागलेल्या लॉकडाऊनमध्ये त्याची नोकरी गेली. न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये लेम म्हणाला की मला ही बातमी कळली तेव्हा मोठा धक्का बसला. मात्र मी त्यामधून सावरलो. मला प्रत्येक गोष्टीवर वेगवेगळ्या पद्धतीनं रिअॅक्ट होण्याची सवय होती. 

मी अनेक तास टिकटॉक व्हिडीओ तयार करण्यात घालवले. त्याचा मला फायदा झाला. माझे व्हिडीओ वेगाने व्हायरल होऊ लागले. लोकांना आवडू लागले. लोकं त्यावर रिअॅक्ट होऊ लागले. आता तर मीम्स देखील होतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Khaby Lame (@khaby00)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Khaby Lame (@khaby00)

लोकांना या तरुणाचे व्हिडीओ किंवा मीम्स यासाठी आवडतात की हा तरुण मजा आणि मस्ती करतो त्यामुळे त्याचा व्हिडीओ पाहून लोकांच्या चेहऱ्यावर हसू येत. त्यासोबतच आयुष्य सोपं कसं जगायचं याची एक छोटी शिकवणंही तो देत असतो. त्यामुळे लोकांना त्याचा व्हिडीओ खूप आवडतो. लेमचे टिकटॉकवर 100 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. इन्स्टावर 34 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. लेम हा सर्वात दुसऱ्या क्रमांकावरचा यशस्वी टीकटॉक स्टार आहे.