'लॅन्सेट' अहवाल । हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या वापराने कोरोनाबाधितांच्या जीवाला धोका !

 कोरोनाविरुद्धचा लढा कायम असताना एक ड्रोक्सिक्लोरोक्वीन टॅबलेट वापराबाबतचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.  

Updated: May 23, 2020, 08:58 AM IST
'लॅन्सेट' अहवाल । हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या वापराने कोरोनाबाधितांच्या जीवाला धोका !

लंडन : जगात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न होत आहेत.कोरोनाविरुद्धचा लढा कायम असताना एक ड्रोक्सिक्लोरोक्वीन टॅबलेट वापराबाबतचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूवरच्या या औषधावर आता प्रश्नचिन्ह उभे राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या वापराने कोरोनाबाधितांच्या जीवाचा धोका वाढतो असा एक नवा अहवाल  'लॅन्सेट' या जगातील प्रसिद्ध वैद्यकीय संशोधनविषयक मासिकात छापण्यात आला आहे.

'लॅन्सेट'मधील अहवालानुसार रुग्णालयातील उपचार घेणाऱ्या सुमारे ९६ हजार कोरोनाबाधितांवरील उपचारांच्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. कोरोनामुळे निर्माण होणाऱ्या श्वसनाच्या आजारावर हायड्रोक्सिक्लोरोक्वीन किंवा क्लोरोक्वीन या दोन औषधांनी उपचार केल्यास रुग्णांच्या मृत्यूची शक्यता बळवते. किंवा त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांची लय बघिडते असेही संशोधनातून पुढे आल्याचे 'लॅन्सेट'ने म्हतले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्त्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना होऊ नये म्हणून हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचे डोस घेत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर जगात अचानक गोळ्यांची मागणी पुन्हा  वाढली आहे. यापार्श्वभूमीवर 'लॅन्सेट'ने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यातयेत आहे.

डब्ल्यूएचओने दिला हा इशारा

दरम्यान, दक्षिण अमेरिका हा आजाराचा एक नवीन केंद्र बनला आहे, आम्ही अनेक दक्षिण अमेरिकन देश पाहिले आहेत ज्यांची संख्या वाढत आहे आणि स्पष्टपणे दिसून येते की त्यापैकी बर्‍याच देशांमध्ये चिंता आहे. परंतु सर्वात जास्त बाधा ब्राझीलला आहे. आम्ही हे देखील लक्षात घेत आहोत की, ब्राझील सरकारने व्यापक वापरासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या वापरास मान्यता दिली आहे. परंतु आम्ही सध्याच्या क्लिनिकल पुराव्यांवरील पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशनने ( Pan American Health Organization) केलेल्या चाचणीत हे औषध उपचारासाठी योग्य नाही. त्याचा काहीही परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. हे लक्षात घ्या, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे, असे वृत्त रॉयटरने दिले आहे. कोविड-१९ च्या उपचारांसाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन चाचण्या पूर्ण होईपर्यंत आणि आमच्याकडे पूर्ण परिणाम दिसून येत नाही, तोपर्यंत ठोस सांगू शकत नाही. मात्र, या औषधाचा परिणाम दिसून येत नाही, असे म्हटले आहे.