Donald Trump : जीवापेक्षाही डोनाल्ड ट्रम्प यांना 'या' गोष्टीची चिंता, व्हिडीओ व्हायरल

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनियामध्ये रॅली घेत असताना अचानक गोळीबार करण्यात आला आहे. सध्या या गोळीबाराचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Updated: Jul 14, 2024, 07:34 PM IST
Donald Trump : जीवापेक्षाही डोनाल्ड ट्रम्प यांना 'या' गोष्टीची चिंता, व्हिडीओ व्हायरल  title=

Donald Trump Shot Live: निवडूक प्रचारसभेदरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात वाचले असून गोळी त्यांच्या उजव्या कानाला लागली आहे. या घटनेत डोनाल्ड ट्रम्प यांना गोळी लागली असती तर त्यांना जीव देखील गमवावा लागला असता. सध्या त्यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांचा गोळीबारातील दुसरा व्हिडीओ जास्त व्हायरल होत आहे. 

दुसऱ्या व्हिडीओमध्ये काय?

पेनसिल्व्हेनियामध्ये रॅली दरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोळीबार करण्यात आला. या घटनेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानाला गोळी लागली आहे. एकामागून एक गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत डोनाल्ड ट्रम्प जखमी झाले आहेत. मात्र, ज्यावेळी गोळी लागली त्यावेळी ते खाली बसले. त्याच वेळी शेजारी असणारे सुरक्षा रक्षक त्यांना वाचवण्यासाठी गेले असता डोनाल्ड ट्रम्प म्हणाले “Let me get my shoes”. सध्या त्यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा व्हिडीओ

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनिया येथील निवडणूक रॅलीत जीवघेणा हल्ला झाला . शनिवारी, राष्ट्रपती निवडणुकीसाठी एका रॅलीला संबोधित करत होते, यावेळी संध्याकाळी 6.15 वाजता, एका संशयित हल्लेखोराने रॅलीच्या बाहेरील उंच ठिकाणाहून स्टेजच्या दिशेने अनेक गोळ्या झाडल्या, ज्यात डोनाल्ड ट्रम्प जखमी झाले. या हल्ल्यात रॅलीत उपस्थित असणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. 

हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया

हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सीक्रेट सर्व्हिसचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर माझ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर तात्काळ कारवाई केल्याबद्दल मी युनायटेड स्टेट्स सीक्रेट सर्व्हिस आणि सर्व कायदा अंमलबजावणी संस्थांचे आभार मानतो असं देखील ते म्हणाले.