पॉप बँड वन डायरेक्शनचा माजी सदस्य गायक लियाम पेनचा याचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. तिसऱ्या मजल्यावरील खोलीच्या बाल्कनीतून पडून त्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. मात्र, मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नसून पोलीस तपास सुरू आहे.
पोलिसांनी एक निवेदन जारी केले की, तो ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या अंमलाखाली असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले. हॉटेल मॅनेजरने सांगितले की, त्यांना हॉटेलच्या मागून मोठा आवाज ऐकला आणि जेव्हा पोलिस तेथे पोहोचले तेव्हा त्यांना एक व्यक्ती त्याच्या खोलीच्या बाल्कनीतून पडलेला दिसला. आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी 31 वर्षीय ब्रिटीश गायकाच्या मृत्यूची माहिती दिली आहे.
लियाम पेनचा अर्जेंटिनामध्ये त्याच्या माजी 'वन डायरेक्शन' बँडमेट नियाल होरानच्या मैफिलीत सहभागी होण्यासाठी होता. दोघेही पुन्हा एकदा स्टेजवर एकत्र आले. लियाम अंमली पदार्थांचे व्यसन आणि मानसिक आरोग्याबाबत संघर्ष करत असल्याची माहिती मिळाली. यावेळी तो बाल्कनीतून चुकून पडला की दारूच्या नशेत होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'वन डायरेक्शन' या बँडचे माजी सदस्य संगीतकार आणि गिटार वादक लियाम जेम्स पायने यांचा आज हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला.'
मृत्यूच्या एक तास आधी लियाम स्नॅपचॅटवर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत होता. सोशल मीडियावर काही फोटो देखील शेअर केले होते. जे फोटो लियाम राहत असलेल्या हॉटेल रूमचे आहेत. हॉटेलची ती रुम अतिशय अस्थाव्यस्थ स्वरुपात दिसली. त्याच्या चाहत्यांनी गायकाच्या हत्येचा दावा केला आहे. लियाम त्याच्या 'किस यू', 'मॅजिक', 'परफेक्ट' आणि 'फॉर यू' या गाण्यांसाठी ओळखला जातो.
लियाम पेनने 2021 मध्ये खुलासा केला होता की 'वन डायरेक्शन' टूर दरम्यान त्याला आत्महत्येचे विचार आले होते. त्यामुळे ही हत्या आहे की घातपात याबाबत अनेक शंका निर्माण झाले आहेत.