'कोका कोला' च्या कॉस्ट्यूममध्ये येऊन रेस्टॉरंट लूटले

अमेरिकेतील केंटकी येथ एक फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये हा अजब प्रकार घडला. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 1, 2017, 10:25 AM IST
'कोका कोला' च्या कॉस्ट्यूममध्ये येऊन रेस्टॉरंट लूटले title=

केंटकी : दरोडा टाकण्याचे वेगवेगळे प्रकार आपण ऐकले असतील. पण एक वेगळ्याच पद्धतीचा दरोडा टाकून रेस्टॉंरट लूटल्याचा प्रकार समोर आला आहे. अमेरिकेतील केंटकी येथे ही घटना घडली आहे. त्यात कोका कोला सारखा वेश परिधान करुन ऐवज लूटला आहे.अमेरिकेतील केंटकी येथ एक फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये हा अजब प्रकार घडला. 

हिंडरसन पोलिस विभागाने त्याच्या फेसबुक पेजवर या घटनेची सीसीटीव्ही फूटेज शेअर केले आहे. सीसीटीव्ही व्हिडीओ पाहता येऊ शकते की संशयास्पद दरोडेखोराने कोका-कोलाच्या बाटलीसारखा दिसणारा पोशाख घातलेला दिसत आहे.
हातात बंदूक घेऊन तो दरोडेखोर रेस्टॉरंटमध्ये शिरला. कोणीतरी भिकारी वैगेरे समजून मॅनेजर त्याला ब्रेड खायला देतो. पण तो बंदूक दाखवून रेस्टॉरंटमध्ये शिरतो आणि ५०० डॉलर्सची चोरी करतो. चोरी झाल्यानंतर त्याने तिथून पळ काढला. दरम्यान दरोडेखोराने मॅनेजरला कोणतीही इजा पोहोचविली नाही.