'No Parking'मध्ये कार लावून मजा करणं तरुणाला पडलं महागात... पाहा व्हायरल फोटो

जेव्हा तो व्यक्ती समुद्रातून मजा करून परत आला, तेव्हा त्याने पाहिले की त्याची कार...

Updated: Aug 25, 2021, 12:00 PM IST
'No Parking'मध्ये कार लावून मजा करणं तरुणाला पडलं महागात... पाहा व्हायरल फोटो title=

मुंबई : बऱ्याच वेळा आपल्याला घाईघाईत कार कुठे पार्क करावी हे कळत नाही, ज्यामुळे आपण चुकीच्या ठिकाणी कार पार्क करतो. त्यामुळे आपल्याला दंड भरावा लागतो आणि ती कार पुन्हा मिळते. परंतु सध्या एक अशी बातमी सोशल मीडियावर चर्चेत आहे, ज्याला 'आ बैल मुझे मार' ही म्हण एकदम योग्य ठरते. काही लोकं त्यांना माहित असून देखीस जर ती चूक करतात मग त्याला आणखी काय म्हणणार?

आज आम्ही तुम्हाला या म्हणीशी संबंधित एक किस्सा सांगणार आहोत. ज्यात एका व्यक्तीने त्याला माहित असून देखील संकटाला मिठी मारली आहे. ज्याची त्याला नंतर मोठी किंमत देखील मोजावी लागली.

ही घटना इंग्लंडमधील कॉर्नवॉलचे आहे. जिथे एक माणूस त्याच्या व्हॅनमधून न्यूक्वे हार्बर बीचवर आनंद घेण्यासाठी आला. त्याने आपली कार अगदी मध्यभागी नेली, तिथे असा इशारा लिहिला होता की, तेथे कार पार्क करण्यास मनाई आहे. जेव्हा तेथे उपस्थित गार्डने देखील त्या व्यक्तीला तेथे कार पार्क करण्यापासून थांबवले, परंतु तरीही त्याने गार्डचे ऐकले नाही, उलट त्याच्याशीच वाद घातल्या आणि नंतर तो समुद्रात मजा करायला गेला.

जेव्हा तो व्यक्ती समुद्रातून मजा करून परत आला, तेव्हा त्याने पाहिले की त्याची कार अर्धी पाण्याखाली बुडाली आहे.

इंग्रजी वेबसाईट मेट्रो मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, चर्चेदरम्यान हार्बर मास्टरने इशाराही दिला होता की, त्या दिवशी समुद्राच्या किनाऱ्यावर उंच लाटा येत होत्या, त्यामुळे तिथे कार पार्क करणे सुरक्षित नाही पण त्या व्यक्तीने ऐकले नाही त्याला.

जेव्हा तो तिथे परत आला, तेव्हा त्याने पाहिले की, समुद्राचे पाणी त्याच्या कारपर्यंत पोहोचले आहे आणि कार पाण्यात बुडाली आहे. त्यानंतर त्याने आपल्या चुकीचा पश्चाताप केला आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांची मदत घेतली आणि खूप प्रयत्न केल्यानंतर लोकांनी कार पाण्यातून बाहेर काढली.