Viral Video : भयानक साप गळ्यात घालून तो मेट्रोमध्ये चढला अन् मग, हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ

Viral Video : सोशल मीडियावर हृदयाचे ठोके चुकविणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्तीच्या गळ्यात भयानक साप दिसतोय. 

नेहा चौधरी | Updated: Jul 30, 2023, 03:03 PM IST
Viral Video : भयानक साप गळ्यात घालून तो मेट्रोमध्ये चढला अन् मग, हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ  title=
man snake hanging around his neck metro video viral Trending News today

Viral Video : सापाचं नावही घेतलं तरी भल्या भल्या माणसाला घाम फुटतो. साधा बिनविषारी साप पण आपल्या समोर आला तर आपल्या हृदयाचे ठोके चुकतात. पावसाळा असल्यामुळे शेतात, बागेत अगदी घरातही साप, अजगर आढळून येतं आहे. जरा तुम्ही विचार करा मेट्रोमधून प्रवास करताना अचानक भयानक असा महाकाय साप आला तर काय होईल? (man snake hanging around his neck metro video viral Trending News today)

सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती जिवंत साप गळ्यात घालून भर गर्दीत मेट्रोमध्ये चढतो. या सापाला बघून मेट्रोमधील प्रवाशी पळून गेले असेल असं तुम्हाला वाटतं असेल. पण नाही थांबा आश्चर्याची गोष्टी या सापाला बघून ना जागेवरुन कोणी उठले ना कोणी घाबरलं. 

हा व्हिडीओमधील हा प्रकार पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका व्यक्तीच्या गळ्यात पिवळ्या रंगाचा मोठा साप आहे. तो व्यक्ती या सापासोबत गर्दीने भरलेल्या मेट्रोमध्ये चढला. तुम्ही पाहू शकता तो साप वारंवार जीभ बाहेर काढत आहे. हा व्यक्ती खेळण्यातील सापाला घालावं तसं हा जीवंत साप घेऊन सार्वजिक ठिकाणी आला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by UNILAD (@unilad)

इन्स्टाग्रामवरील unilad अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्यक्ती मोठा अभिमानाने तो साप घेऊन फिरत आहे.