OMG! तरुणानं गिळला जिवंत साप, डॉक्टरही जीभ पाहून झाले हैराण ​

असा स्टंट जीवावर बेतू शकतो त्यामुळे जीवघेणे स्टंट करू नका, प्रसिद्धीसाठीचा स्टंट तरुणाला पडला महागात 

Updated: Sep 25, 2021, 07:44 PM IST
OMG! तरुणानं गिळला जिवंत साप, डॉक्टरही जीभ पाहून झाले हैराण ​

नवी दिल्ली: बऱ्याचदा प्रसिद्धीसाठी जीवघेणे स्टंट केले जातात. मात्र हे स्टंट जीवावर बेतू शकतात याची कल्पना असतानाही काही लोक हे स्टंट करतात. असे स्टंट तुम्ही करू नका. एका तरुणाने स्टंट करताना दिसतात. साप चावल्यामुळे कोणाचाही मृत्यू होऊ शकतो हे माहीत असतानाही सापाशी खेळ केल्याचं बऱ्याचदा दिसतं. नुसता साप म्हटलं तरी काहीजणांच्या अंगावर काटा येतो. पण एका व्यक्तीने चक्क जिवंत साप गिळला आहे. 

आतापर्यंत टीव्हीवर शोमध्ये सापाला खाताना पाहिलं असेल. पण एका माणसानं चक्क जिवंत साप गिळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सापाला जिवंत गिळणाऱ्या व्यक्तीला या जीवघेण्या स्टंटमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

रशियातील 55 वर्षीय शेतमजूराचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये तो माणूस साप गिळताना दिसत आहे. डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार त्या व्यक्तीने साप गिळण्याचा दोन वेळा प्रयत्न केला. तिसऱ्या प्रयत्नात जेव्हा तो गिळण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा सापाने त्याची जीभ चावली. यानंतरही तो थांबला नाही, त्यामुळे सापाने त्या व्यक्तीच्या गळ्याला चावा घेतला.

काही तासांनंतर या व्यक्तीची प्रकृती खूप जास्त खालावली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरही या व्यक्तीची स्थिती पाहून हैराण झाले. डॉक्टरांनी सांगितलं की सापाच्या चाव्यामुळे या व्यक्तीला अॅलर्जी झाली आहे. या व्यक्तीच्या घशात खूप सूज आली आहे. डॉक्टरांच्या मते, त्या व्यक्तीला अॅनाफिलेक्टिक शॉक झाला. 

सापाच्या चाव्यामुळे त्या व्यक्तीची जीभ इतकी सुजली की तोंडात बसणे जराही जमले नाही, यामुळे व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्याचा मृत्यू झाला. अहवालानुसार या भागातील स्थानिक लोकांमध्ये साप गिळण्याची प्रथा आहे. इथे शेतात स्टेप वायपर नावाचा साप आढळतो. जो विषारी नसतो मात्र माणसांना त्याच्यापासून धोका पोहोचवू शकतो. व्यक्तीच्या मृत्यूनंतर स्थानिक प्रशासनाने लोकांना साप गिळू नका असे आवाहन करत आहेत.