टॅटू काढल्यानंतर पोहायला गेल्यानं तरुणाचा मृत्यू

शरीरावर टॅटू काढल्यानंतर समुद्रात पोहायला गेलेल्या एका व्यक्तीला आपल्या प्राणाला मुकावं लागलंय. समुद्राच्या पाण्यात पोहताना घातक संसर्ग झाल्यानं या ३१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय. 

Updated: Jun 1, 2017, 03:29 PM IST
टॅटू काढल्यानंतर पोहायला गेल्यानं तरुणाचा मृत्यू title=

नवी दिल्ली : शरीरावर टॅटू काढल्यानंतर समुद्रात पोहायला गेलेल्या एका व्यक्तीला आपल्या प्राणाला मुकावं लागलंय. समुद्राच्या पाण्यात पोहताना घातक संसर्ग झाल्यानं या ३१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय. 

डेली मेलनं दिलेल्या माहितीनुसार, टॅटू बनवणाऱ्या आर्टिस्टनंही या व्यक्तीला दोन आठवड्यांपर्यंत पोहायला न जाण्याची चेतावणी दिली होती. पाच दिवसांपूर्वी या व्यक्तीनं आपल्या डाव्या हातावर धार्मिक क्रॉस बनवला होता. त्यानंतर तो 'गल्फ ऑफ मेक्सिको'मध्ये गरम पाण्यात पोहण्यासाठी गेला. 

यावेळी, पाण्यात मांस खाणाऱ्या बॅक्टेरियाच्या संसर्गानं या टॅटू काढलेल्या भागातून सहज शरीरात प्रवेश केला. यामुळे दुसऱ्या दिवशी त्याला ताप भरला... त्याची तब्येत खालावली आणि अखेर त्याला आपला प्राण गमवावा लागला.