तबलिगी जमातीच्या मौलानाने रडत मागितली अल्लाची माफी

आम्हाला या कोरोनापासून वाचव. आम्ही मूर्खपणा केला

Updated: Apr 26, 2020, 01:26 PM IST
तबलिगी जमातीच्या मौलानाने रडत मागितली अल्लाची माफी  title=

मुंबई : संपूर्ण जग कोरोना नावाच्या विषाणूशी लढत आहेत. प्रत्येकजण कोरोनामुक्त होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशावेळी मौलानांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ पाकिस्तानच्या एका लाईव्ह शोमध्ये अल्लाची माफी मागत आहे. हे मौलाना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानसमोर मोठमोठ्याने रडत होते. 

तबलिगी जमातीचे पाकिस्तानमधील लोकप्रिय मौलाना तारिक जमील हे कोरोनासंदर्भात पाकिस्तानच्या एका लाईव्ह कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान देखील उपस्थित होते. कोरोना व्हायरस संदर्भात बोलत असताना मौलाना यांना रडू कोसळलं. आणि त्यांनी भर कार्यक्रमात अल्लाची माफी मागितली. मौलाना तारिक जमील हे पंतप्रधान इम्रान यांचे खूप जवळचे मानले जातात.

जागितक साथीचा रोग कोरोना जो जगभर पसरला आहे. या संदर्भात बोलत असताना मौलानांना अश्रू अनावर झाले. त्यांनी अल्लाची माफी मागून,'आम्हाला या कोरोनापासून वाचव. आम्ही मूर्खपणा केला. आम्हाला या चुकीकरता माफ कर. आम्ही खूप मोठी चूक केली आहे. आम्ही हे संकट टाळू शकत नाही. या सगळ्या संकटातून फक्त आता तूच आम्हाला वाचवू शकतो.' या लाईव्ह कार्यक्रमात उपस्थित असणारे सगळेच मौलानांच बोलणं ऐकत होते. त्यांनंतर सगळ्यांनी मौलाना यांच्यासोबत अल्लाची प्रार्थना केली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

 दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तबलिगी जमातच्या मरकज कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या लोकांमुळे देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना फैलाव झाला. निजामुद्दीनमधल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाने दिल्ली हादरली. या कार्यक्रमाने तर अनेकांना कोरोना झाल्याचे पुढे आले. तर काही जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, मौलाना साद हे २८ मार्चपासून गायब आहेत. निझामुद्दीन भागातल्या तबलिगी समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात देशभरातून जवळपास १८३० जण सहभागी झाले होते.