पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय बैठक

आशियाई देशांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मनिलामध्ये पोहोचले आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. रविवारी, पंतप्रधान मोदींनी अनेक प्रमुख नेत्यांची भेट घेतली. ज्यात अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश आहे.

Updated: Nov 13, 2017, 10:19 AM IST
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय बैठक title=

नवी दिल्ली : आशियाई देशांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मनिलामध्ये पोहोचले आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. रविवारी, पंतप्रधान मोदींनी अनेक प्रमुख नेत्यांची भेट घेतली. ज्यात अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश आहे.

सोमवारी पंतप्रधान मोदी आणि फिलीपीनचे अध्यक्ष रॉड्रिगो दुतर्ते यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार आहे. याशिवाय, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी देखील द्विपक्षीय चर्चा होऊ शकते, या दोघांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल.

'आसियाई' देशांच्या पत्रकारांशी बोलताना, भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपानच्या अधिकाऱ्यांना आशियातील पॅसिफिक भागात, चारही देशांच्या सुरक्षा सहयोगावर बैठक घेतली. भारत-पॅसिफिक भागात (इंडो-पॅसिफिक अंतर्गत सहकार्य ) मुक्त, समावेशक आणि सामान्य हितसंबंधांना आणखी प्रोत्साहन देण्याच्या मुद्यावर चर्चा झाली.

भारत-पॅसिफिक भागाला मुख्य चर्चेचा विषय म्हणून समावेश केला गेला. सर्व देशांच्या अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर सुनिश्चित करण्याचा संकल्प केला.