Trending News : डिसेंबर महिना सुरु झाल्यावर सगळ्यात जास्त मुलांना नाताळ या सणाची आठवण होते. हा सण मुलांच्या अगदी जवळ आहे. ख्रिसमसमध्ये (Christmas Day) मुलं सांताक्लॉजला (Santa Claus) पत्र लिहित असतात. ही एक परंपरेचा भाग आहे. मुलांना विश्वास आहे की त्यांची पत्रे सांतापर्यंत पोहोचतील आणि त्यांची इच्छा पूर्ण होईल की जर ते चांगले वागले तर. आवडत्या खेळण्यांची मागणी करण्यापासून ते प्रामाणिक कबुलीजबाब देण्यापर्यंत, मुले सांताक्लॉजला लिहिलेल्या पत्रांमध्ये खूप प्रयत्न करतात. आपण नेहमीच सोशल मीडियावर अनेक लहान मुलांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल (Viral) होत असतात. 8 वर्षांच्या मुलीने सांताला लिहिलेले असेच एक पत्र ट्विटरवर (Twitter) व्हायरल झाले असून, अनेकांना त्यांच्या बालपणाची आठवण तिनं करुन दिली आहे.
यूकेच्या (UK) एका महिलेने अलीकडेच तिच्या भाचीने ख्रिसमसच्या आधी सांताला लिहिलेल्या पत्राचा फोटो शेअर केला आहे. तिने ट्विटला (Tweet) कॅप्शन (Caption) दिले की, ''माझ्या बहिणीला नुकतेच सांताला लिहिलेलं हे पत्र सापडले आहे, जे तिच्या 8 वर्षांच्या मुलीने लिहिले आहे.
ट्विट येथे पहा:
My Sister has just found this letter to Santa, written by her 8 year old Daughter. It’s made me cry a lot to think that someone so young is even thinking about this! pic.twitter.com/GT4c5i8O3Q
— Nicole Connell (@BradsMrs) November 24, 2022
स्वत:साठी भेटवस्तू मागण्याऐवजी, निस्वार्थी मुलीने सांताला तिच्या आई आणि बाबांना आर्थिक मदत करण्यास सांगितले, कारण ते ''बिल आणि गहाणखत यांच्याशी झुंजत होते''.
पत्रात लिहिले आहे की, 'सांताला, मला ख्रिसमससाठी फक्त मम्मी आणि डॅडीसाठी पैसे हवे आहेत. ते बिले आणि गहाणखत संघर्ष करतात. मलाही वाईट वाटतं. प्लीज, प्लीज सांता तू हे काम करू शकतोस का? मला माहित आहे की मी दिलगीर आहोत तरीही ते खूप आहे. एम्मीवर प्रेम करा.'' पत्राचा शेवट 'कृपया' ने झाला.
या पत्राने सोशल मीडियावर अनेकांना रडू कोसळले. हल्ली इतका समजूतदारपणा कुठे पाहायला मिळतो.तिनं चक्क स्वत:साठी काहीच न मागता आपल्या आई वडिलांसाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी पत्र लिहिले. पत्राचा शेवट कृपया या शब्दाने झाला. हृदयस्पर्शी पत्राने अनेकांना भावूक केले आहे अनेक यूजरने आपली कमेंट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या. एका यूजरने लिहिले की, 'अश्रू आणि सर्वकाही. तर दुसर्याने लिहिले की, ' लहान मुलं ही नेहमीच जीवनाला सर्वात सोप्या पद्धतीने पाहतात आणि ते जसे आहे तसे सांगतात - ही मुलगी फक्त 8 वर्षांची आहे …….तिनं तिच्या पालकांच्या आर्थिक परिस्थितीसाठी फक्त सांता ला पत्र लिहिले.