Mixer जारचं ब्लेड झालंय जाम? आता घरच्या घरी करा दुरुस्त

Mixer  Blade : मिक्सर जारचं ब्लेड खराब झालं किंवा जाम झालं तर काय करायला हवं, तर आता घरच्या घरी करा तुमच्या मिक्सर जारच्या ब्लेडला दुरुस्त... याशिवाय मिक्सर जारचं ब्लेड जाम होण्याचं कारण तुम्हाला माहितीये का? नसेल माहित तर आताच जाणून घ्या कधीही होईल फायदा....

दिक्षा पाटील | Updated: May 11, 2023, 06:59 PM IST
Mixer जारचं ब्लेड झालंय जाम? आता घरच्या घरी करा दुरुस्त title=
(Photo Credit : Pexel)

Mixer  Blade : जेवण बनवणं ही काय सोपी गोष्ट नाही. आज आपल्याकडे जेवण बनवण्यासाठी सोपं झालं आहे त्याचं कारण आपल्याकडे असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू. त्याच्यामुळे जेवण बनवणं सोपं झालं आहे. पण त्यात आपल्या आजी-आजोबांच्या काळात तर जेवण बनवण्यासाठी कोणताही शॉर्ट-कट नव्हता. ते स्वत: सगळ्या गोष्टी हातानं करून खायचे. मसाला दळायचा असला की पाटा-वरवंट्यावरच ते सगळं होऊ शकत होतं. आता आपल्याकडे अर्थात प्रत्येक घरात मिक्सर आहेच. मिक्सर शिवाय जेवणं बनवणं हे कठीणचं आहे. पण मिक्सरच्या भांड्यात असलेलं ब्लेड जाम होतं. त्याचं कारण काय हे आज आपण जाणून घेऊया...

मिक्सर जारमध्ये असलेलं ब्लेड जर जाम झाले तर अनेकांना जेवणं बनवणं कठीण होतं. पण मिक्सर जारमध्ये असलेलं हे ब्लेड खराब होणं ही काही नवीन गोष्ट नाही. जर कधी काही दळताना तुम्हाला जाणवलं की मिक्सरच्या जारमध्ये असलेलं ब्लेड जाम झालं आहे तर त्याकडे लगेच लक्ष द्या. अशा परिस्थितीत तुम्ही काय करायला हवं? आज आम्ही तुम्हाला जाम झालेल्या मिक्सरच्या ब्लेडला मोकळे करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. 

मिक्सरचे  ब्लेड न फिरण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे सतत तेलकट आणि मीठ असलेले पदार्थ मिक्सर करणे.  त्याचा परिणाम  होऊन ब्लेड जाम होतात आणि ते जी स्पीड हवी त्या स्पीडनं फिरू शकत नाही. आता जर तुमचं मिक्सरच्या जारमध्ये असलेलं ब्लेड जाम झालं असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकतात. 

मिक्सरच्या जारचे ब्लेड जाम झाले असेल तर तुम्ही त्याला विरुद्ध दिशेनं फिरवण्याचा प्रयत्न करा. जर तरी मिक्सरच्या जारचं ब्लेड मोकळं होत नसेल तर त्यात खोबरेल किंवा मोहरीच्या तेलाचे काही थेंब टाका आणि आता पुन्हा ब्लेड हाताने उलट्या दिशेने जवळपास 10 मिनिटांसाठी  फिरवा. 

10 मिनिटांनी मिक्सर जारचं हे भांड मोटर युनिटला लावा आणि एकदा मिक्सर चारू करून बघा. जर ते कोणत्याही अडथळ्याशिवाय फिरू लागलं तर तुमच्या समस्येचं समाधान झालं आहे. मिक्सर ब्लेड फिरत नसेल तर त्याच आणखी एक कारण म्हणजे जारचं ब्लेड हे वाकडं झालं आहे. सतत किंवा मग लिमीटपेक्षा जास्त मिक्सर जार नेहमी भरल्यामुळे ही समस्या उद्भवते. तर सगळ्याच शेवटचा पर्याय म्हणजे मिक्सरचं कपलर किंवा ब्लेड बदला. हा पार्ट तुम्ही मार्केटमधून विकत घेऊ शकतात. 

तुमच्या मिक्सरच्या जारचं ब्लेड नीट फिरू लागलं आहे. जर ते नीट झालं नाही तर तुम्ही मिक्सर रिपेयर करणाऱ्याकडे जा किंवा ज्याच्याकडून तुम्ही मिक्सर विकत घेतलं आहे त्याला कॉल करा.