Gay, Biosexual मध्ये मंकीपॉक्सचा मोठा फैलाव?, नेमकं कारण काय?

भारतात मंकीपॉक्स(Monkeypox)चे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) समलिंगी (gay), उभयलिंगी (biosexual) आणि पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या इतर पुरुषांसाठी सार्वजनिक आरोग्य सल्लागार जारी केला आहे.

Updated: May 27, 2022, 12:44 PM IST
Gay, Biosexual मध्ये मंकीपॉक्सचा मोठा फैलाव?, नेमकं कारण काय? title=

नवी दिल्ली : भारतात मंकीपॉक्स(Monkeypox)चे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) समलिंगी (gay), उभयलिंगी (biosexual) आणि पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या इतर पुरुषांसाठी सार्वजनिक आरोग्य सल्लागार जारी केला आहे.

सध्या अनेक देशात मंकीपॉक्सने थैमान घातलंय. विशेष म्हणजे, ज्या देशात मंकीपॉक्सचे रुग्ण नाहीत, तिथे मोठ्या प्रमाणात फैलाव झाल्याची माहिती समोर आली आहे. सार्वजनिक आरोग्य सल्लागाराने दिलेल्या माहिती नुसार, मंकीपॉक्सचे काही केसेस हे समलिंगी किंवा उभयलिंगी असल्याची माहिती समोर आली. 

मंकीपॉक्सचा धोका फक्त पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या इतर पुरुषांना नाही. तर शारीरिक संबंध ठेवणाऱ्यांना सुद्धा धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

मंकीपॉक्स कसा पसरु शकतो?

मंकीपॉक्सचे लक्षणे दिसत असलेल्या व्यक्तीशी जवळीक साधल्यास त्यांच्यापासून मंकीपॉक्स पसरण्याचा सर्वाधिक धोका आहे. तर लक्षणे असलेल्या व्यक्तीला केलेल्या स्पर्शाने सुद्धा मंकीपॉक्स होण्याची भीती आहे.