अद्भूत! चंद्रावर सापडली गुहा, येऊ लागले शिट्ट्यांचे आवाज! तिथं मानवी हालचाली की एलियन्सचा वावर? पाहा Video

cave on the Moon : चंद्र आणि चंद्राभोवती फिरणाऱ्या अनेक संकल्पना आणि रहस्यांची उकल करण्यासाठी मागील बराच काळ शास्त्रज्ञ प्रयत्न करताना दिसत होते.   

सायली पाटील | Updated: Jul 16, 2024, 10:18 AM IST
अद्भूत! चंद्रावर सापडली गुहा, येऊ लागले शिट्ट्यांचे आवाज! तिथं मानवी हालचाली की एलियन्सचा वावर? पाहा Video  title=
Nasa Scientists have discovered a cave on the Moon released picture video viral

Cave on the Moon : अवकाशात समांतर विश्वाचं (Parallel Universe) अस्तित्वं आणि त्या विश्वातील विविध घटकांचा अभ्यास करत नवनवीन सिद्धांत मांडणाऱ्या शास्त्रज्ञांना एका अवाक् करणाऱ्या रहस्याची उकल करण्यात यश मिळालं आहे. चंद्राच्या पृष्ठापासून तिथं असणारी माती, तेथील ध्रुव आणि चंद्रावरील जीवसृष्टीचा वावर यासंदर्भातील निरीक्षणांदरम्यानच एक अशी भारावणारी गोष्ट समोर आली आहे ज्यामुळं आता नवनवीन दावेही केले जात आहेत. 

हा अद्भूत शोध म्हणजे, चंद्रावरील गुहा. चंद्रावर आढळलेल्या या गुहेमध्ये येत्या काही वर्षांमध्ये किंवा भविष्यात मानवी वावर सहज शक्य आहे अशी आशा सध्या व्यक्त केली जात आहे. बीबीसीनं नासाच्या हवाल्यातून या गुहेचे काही फोटो शेअर करत त्यासंदर्भात माहिती दिली. साधारण 100 मीटर इतकी खोली असणाऱ्या या गुहेमध्ये मनुष्याता तळ ठोकता येऊ शकतो असं म्हणत अशा शेकडो गुहा चंद्रावर असण्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला. हेलन शर्मन या ब्रिटनच्या पहिल्या अंतराळवीरांच्या माहितीनुसार ही गुहा पाहताक्षणी एका सुरक्षित तळाची अनुभूती देते. 

कुठे आढळली ही गुहा? 

अपोलो 11 जिथं लँड झालं होतं त्या ठिकाणापासून ही गुहा फार दूर नाही. अपोलो 11 हे तेच अंतराळयान आहे, ज्यानं 55 वर्षांपूर्वी चंद्रावर यशस्वी लँडिंग करत त्यातून अवकाळात गेलेल्या नील आर्मस्ट्राँग आणि बज एल्ड्रिन यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं होतं. याच ठिकाणापासून साधारण काही अंतरावरह ही गुहा आढळली आहे. NASA च्या  'लूनर रिकॉनिसेंस ऑर्बिटर'च्या माध्यमातून करण्यात आलेल्या विश्लेषणाच्या माध्यमातून या गुहेचं संशोधन जगासमोर येण्यास मदत झाली आहे. 

संशोधक आणि अभ्यासकर्त्यांनी या गुहेची तुलना पृथ्वीवर ज्वालामुखीच्या उद्रेकातून नैसर्गिकरित्या तयार झालेल्या भुयारांशी केली आहे. Nature Astronomy जर्नलमध्ये सर्वप्रथम या गुहेसंदर्बातील निरीक्षण प्रसिद्ध करण्यात आलं. दरम्यान, चंद्रावर सापडलेल्या या गुहेसंदर्भातील माहिती समोर येतानाच दुसरीकडे एक असाही व्हिडीओ व्हायरल होत आहे जिथं अंतराळवीरांना चंद्रावरून काही विचित्र, शिळ वाजवल्यासारखे आवाज आले होते. 1969 मधील अपोलो 10 मोहिमेदरम्यानचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जातं. चंद्रावर मानवी हालचालींसाठीच्या वातावरणाचं संशोधन सुरू असतानाच समोर आलेले हे आवाज नेमके कशाचे होते, इथं एलियन्सचा वावर आहे का? अशा प्रश्नांनी पुन्हा डोकं वर काढलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by BBC News (@bbcnews)

चंद्रावरील गुहा इतक्या महत्त्वाच्या का आहेत? 

चंद्रावरील जीवसृष्टीसंदर्भातील निरीक्षणं सुरु असतानाच समोर आलेली ही गुहा म्हणजे अतिशय कमाल संशोधन असून संकटाच्या प्रसंगी अंतराळवीरांना ती आसरा देण्याचं काम करु शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. या गुहेसंदर्भातील पुढील संशोधन सुरू असून, येत्या काळात (NASA) नासाकडून चंद्रावर सेमी-परमनेंट (अर्ध-स्थायी) क्रू बेस बनवण्याच्या दिनेशंही पावलं उचलली जात आहेत.