कराची : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाजचा जगातल्या ११ शक्तीशाली महिलांच्या यादीत समावेश करण्यात आलाय.
न्यूयॉर्क टाइम्स द्वारे जाहीर करण्यात आलेल्या २०१७ च्या यादीत तिची नाव देण्यात आलंय. न्यूयॉर्क टाईम्सने गेल्या २७ ऑक्टोबरला आपल्या एका लेखात लिहिले होते की, मरियम नवाजने वडीलांचा राईट हॅन्ड ओळख तयार केली आहे. मरियम ही शरीफ यांची राजकीय उत्तराधिकारी मानली जात आहे.
मरियमकडे स्वर्गीय पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांच्यासारखे पाहिले जाते. कारण मरियम सुद्धा राजकारणात बेनजीर भुट्टो यांच्या पावलावर पाऊल देत काम करत आहे. बेनजीरप्रमाणेच ती नेहमी महिलांच्या हक्कासाठी आणि रुढीवादी इस्लाम विरोधात आवाज उठवत असते. त्यामुळे तिला पाकिस्तानात चांगलीच पसंती मिळत आहे.
मरियमला नोव्हेंबर २०१३ मध्ये पंतप्रधान द्वारे तरूणांसाठी चालवल्या जाणा-या कार्यक्रमाचे अध्यक्ष बनवले. पद सांभाळल्यानंतर काही दिवसातच मरियमने १० हजार कोटी रूपयांची ‘यूथ बिझनेस लोन’ स्कीमची घोषणा केली होती. या निर्णयाची संपूर्ण पाकिस्तानमध्ये कौतुक करण्यात आलं. तरीही मरियमला नवाज शरीफ यांनी मंत्रालयाची जबाबदारी दिली नव्हती. आपल्या सौंदर्यासोबतच मरियम कम्युनिकेशन स्किल्स आणि प्लॅनिंगसाठीही ओळखली जाते.
मरियमच्या पतीला नवाज शरीफ यांनी पक्षातून काढले होते. मरियमचे पती मोहम्मद सफदर हे आधी सेनेत होते. आर्मीतून रिटायर झाल्यानंतर नवाज शरीफ पीएमएल-एल पार्टीचे चीफ ऑर्गनायझर बनवण्यात आले होते. शरीफ यांना सफदर यांचं काम पसंत नव्हतं. सफरद हे शरीफ यांचा पक्षा सोडून दुसरा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत होता. त्यानंतर त्याला पक्षातून काढण्यात आले.
लाहोरमध्ये २८ ऑक्टोबर १९७३ ला जन्मलेल्या मरियमला चार भाषा येतात. इतकेच नाही तर ती पाकिस्तानला एक कट्टरपंथी प्रतिमा देण्याच्या प्रयत्नावर एक थिसिस तयार करत आहे. ते नेहमीच आपल्या भाषणांमध्ये सांगते की, पाकिस्तानला कट्टरपंथी प्रतिमेपासून वाचवणे पाकिस्तानच्या अस्तित्वासाठी महत्वाचं आहे.