नेपाळमध्ये शेर बहादूर देबुआंनी दिला पंतप्रधानपदाचा राजीनामा

दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ आता नेपाळला ही मोठा धक्का बसला आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 15, 2018, 02:31 PM IST
नेपाळमध्ये शेर बहादूर देबुआंनी दिला पंतप्रधानपदाचा राजीनामा  title=

काठमांडू : दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ आता नेपाळला ही मोठा धक्का बसला आहे. 

नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देबुआ यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. या पदावर आता खडगा प्रसाद ओली येणार आहेत. ओली यांची आता लवकरच शपविधी होणार आहे. देबुआ हे नेपाळचे 40 वे पंतप्रधान होते. 

का दिला राजीनामा? 

2017 च्या मे महिन्यात त्या आधीचे पंतप्रधान पुष्पा कमल दहल म्हणजे प्रचंड यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. आणि त्यांच्या जागी शेर बहाद्दूर देबुआ यांनी पदभार स्विकारला. नऊ महिन्यात देबुआ यांनी राजीनामा दिला आहे.