VIDEO: ...आणि म्हणून बॅगसोबत महिला स्कॅनिंग मशीनध्ये शिरली

एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीसोबत किंवा प्राण्यांवर प्रेम असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. मात्र, कुणाला आपल्या हँड बॅगवर प्रेम असल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? नाही ना? पण आता असाच एक विचित्र प्रकार समोर आला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Feb 15, 2018, 11:50 AM IST
VIDEO: ...आणि म्हणून बॅगसोबत महिला स्कॅनिंग मशीनध्ये शिरली  title=
Image: Twitter @PDChina

नवी दिल्ली : एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीसोबत किंवा प्राण्यांवर प्रेम असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. मात्र, कुणाला आपल्या हँड बॅगवर प्रेम असल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? नाही ना? पण आता असाच एक विचित्र प्रकार समोर आला आहे.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

चीनमधील एका रेल्वे स्थानकात एक महिला चक्क आपल्या हँड बॅगसोबतच स्कॅनर मशीनमध्ये शिरते. ही संपूर्ण घटना रेल्वे स्थानकावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

या घटनेने सर्वांनाच एक धक्का बसला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, आपली हँड बॅग गायब होऊ नये असे वाटत असल्यामुळे ही महिला स्कॅनिंग मशीनच्या आतमध्ये शिरली.

सुरक्षेच्या कारणास्तव प्रत्येक रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचं सामान तपासण्यासाठी स्कॅनर मशीन आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असतात.