अमेरिकेचा दावा : लवकरच मिळणार कोरोनावर वॅक्सीन

 या महामारीवर याचवर्षी औषध मिळणार

Updated: May 26, 2020, 02:37 PM IST
अमेरिकेचा दावा : लवकरच मिळणार कोरोनावर वॅक्सीन title=

कॅनबरा : अमेरिकेतील एका बायोटेक्नॉलॉजी कंपनीने ऑस्ट्रेलियात कोरोना व्हायरस संक्रमणावर औषध शोधून काढल्याचा दावा केला आहे. या औषधांची मनुष्य चाचणी केल्याची घोषणा कंपनीने केली आहे. कंपनीने आशा व्यक्त केली आहे की, या महामारीवर याचवर्षी औषध मिळणार आहे. 

बायोटेक्नॉलॉजी कंपनी नोवावॅक्सचे प्रमुख संशोधक डॉ. ग्रिगोरी ग्लेनने सांगितलं की, कंपनी पहिल्या चरणात परीक्षण सुरू केलं आहे. ज्यामध्ये मेल्बर्न आणि ब्रिस्बेन शहरात १३१ स्वयंसेविकांवर या औषधाचं परीक्षण केलं आहे. 

ग्लेनने 'नोवावॅक्स'मध्ये मेरीलँडमधील मुख्यालयात ऑनलाइन पत्रकार परिषद घेतली. यामध्ये आम्ही औषधांसोबत लस देखील शोधत आहेत. या वर्षाच्या अखेरीपर्यंत औषध आणि लस दोन्ही तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. 

चीन, अमेरिका आणि यूरोपमध्ये जवळपास १२ औषधांच परीक्षण केलं जाणार आहे. यामधील कोणती औषध योग्य आहेत. याबाबत अजून संशोधन सुरू आहे. सगळ्या औषधांचा परिणाम हा वेगवेगळा होत आहे. 

नोवावॅक्स यांनी गेल्या महिन्यात असा दावा केला आहे की, आम्ही व्हायरसला हात देखील लावत नाही. मात्र हा रोग कोणत्या प्रतिरोधक क्षमता असलेल्या व्हायरस असल्याप्रमाणे कळत आहे. 

कोरोना संसर्गाबाबत संशोधकांनी एका नवीन माहितीबाबत दावा केला आहे. कोरोना व्हायरसचा रुग्ण 11 दिवसांनंतर संसर्ग पसरवू शकत नाही, 12व्या दिवशी जरी कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह असला तरी, त्या रुग्णाकडून संसर्ग होऊ शकत नसल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. 

nypost.comच्या रिपोर्टनुसार, सिंगापूर नॅशनल सेंटर फॉर इन्फेक्शन डिसिजेस (NCID) अँड अकॅडमी ऑफ मेडिसिन यांच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.

सिंगापूर नॅशनल सेंटर फॉर इन्फेक्शन डिसिजेजने जवळपास 73 कोरोना रुग्णांवर अभ्यास केला. या अभ्यासादरम्यान त्यांना याबाबत माहिती मिळाली. संशोधकांनी सांगितलं की, 11 दिवसांनंतर कोरोना व्हायरसला आयसोलेट केलं जाऊ शकत नाही.