Trending Video: मॉडेलचं धार्मिक स्थळासमोर ते Photoshoot वादात, गोंधळानंतर काय म्हणाली पाहा...

Italy Photoshoot : या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता,  कॅथेड्रलसमोर अर्धनग्न राहून एका मॉडेलने फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटसाठी महिलेने शरीरावर फक्क एक लाल कपडा ओढला आहे.   

Updated: Oct 23, 2022, 04:19 PM IST
Trending Video:  मॉडेलचं धार्मिक स्थळासमोर ते Photoshoot वादात, गोंधळानंतर काय म्हणाली पाहा... title=
Nude Photoshoo Britain Model Video Viral on Social media nmp

Britain Model Nude Photoshoo Video : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) त्याच्या न्यूड फोटोशूट (Nude Photoshoo) त्याला चांगलंच भोवलं आहे. त्यानंतर आता अजून एका मॉडेलने (British woman) शहरात भररस्त्यात फोटोशूट केल्यामुळे वादात अडकली आहे. तिचा न्यूड फोटोशूटचा व्हिडीओ सोशल मीडियावर ( Social media) व्हायरल झाल्यानंतर तिने दिलेल्या स्पष्टीकरण्यामुळे स्थानिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या मॉडेलने धार्मिक स्थळावर न्यूड फोटोशूट केल्यामुळे एकच वाद निर्माण झाला आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता,  कॅथेड्रलसमोर अर्धनग्न राहून एका मॉडेलने फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटसाठी महिलेने शरीरावर फक्क एक लाल कपडा ओढला आहे. या मॉडेलचं फोटोशूट पाहून स्थानिकांना आश्चर्यचकित झाले आहेत. या फोटोशूटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल  झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. 

मॉडेलने दिलं स्पष्टीकरण

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार मॉडेलने न्यूड फोटोशूट प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. ती म्हणाली की, तिने हे सर्व वैयक्तिक मेमरी (personal memory) तयार करण्यासाठी केलं आहे. तिच्या या फोटोशूटसाठी आणखी दोन जणांनी मदत केली. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता पहाटे कॅथेड्रलच्या पायऱ्यांवर (cathedral steps) असे फोटोशूट पाहून सर्वजण थांबल्याचे दिसत आहे. सर्वांनी आपापले फोन काढून घटनेचे रेकॉर्डिंग सुरू केले. या फोटोशूटसाठी महिला ज्या दरवाजासमोर उभी आहे त्या दरवाजावर येशूचे चित्र आहे.

कुठलं आहे प्रकरण? 

ही घटना इटलीमधील (AMALFI, ITALY) आहे. इटलीतील अमाल्फीमध्ये अनेक ख्रिश्चन धर्माशी संबंधित ऐतिहासिक स्थळं आहेत.  यापैकी एका धार्मिक स्थळावर हे फोटोशूट करण्यात आलं आहे. दरम्यान, स्थानिक अधिकार्‍यांना घटनास्थळी बोलावल्यावर हे फोटोशूट थांबविण्यात आले. या प्रकरणी मॉडेल, कॅमेरामन आणि अन्य एका व्यक्तीला ताकदी देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या तिघांजवळ फोटोशूटसाठी परवानगी नव्हती. 

फोटोशूटवरून लोक संतापले

एका धार्मिक स्थळावर महिलेच्या फोटोशूटमुळे पुराणमतवादी इटालियन लोक संतापले (people angry) आहेत. एका व्यक्तीने फेसबुकवर लिहिले की, 'ऐतिहासिक कॅथेड्रलसमोर असे फोटोशूट करणे मान्य नाही.' वर्षभरापूर्वी मॉस्कोमधील एका धार्मिक स्थळासमोर एक फोटोशूट झाले होते, ज्यामध्ये त्या व्यक्तीला तुरुंगवास भोगावा लागला होता.