मुंबई: कधी लॉटरीचं तिकीट घेतलं आणि लॉटरी आपल्याला लागेल याचा विचार केला किंवा प्रत्यक्षात लागली असं फारच कमी घडतं. मात्र एका व्यक्तीचं नशीब एकदा नाही तर दोन वेळा तीन वर्षात फळफळलं आहे. लॉटरी विक्रेत्याच्या म्हणण्यावरून एका व्यक्तीनं तिकीट घेतलं. लॉटरी विक्रेत्याची भविष्यवाणी खरी ठरली. एकदा नाही तर दुसऱ्यांदा या व्यक्तीला लॉटरी लागली.
काही लोकांचं नशीब एकदा नाही तर अनेकदा चमकतं हे म्हणणं खरं ठरलं आहे. मॅसाचुसेट्स इथे पाहणाऱ्या एक व्यक्तीला अचानक लॉटरीचं तिकीट खरेदी करण्याची इच्छा झाली. त्याने लॉटरी विक्रेत्याच्या सांगण्यावरून लॉटरीचं तिकीट घेतलं आणि दुसऱ्यांदा 7 कोटीहून अधिक रुपयांची लॉटरीच लागली.
फ्रामिंघम इथे राहणाऱ्या स्टीफन टोटो याने लॉटरी अधिकाऱ्यांना सांगितलं की लॉटरीचं तिकीट खरेदी करण्याचं असं काही नियोजन नव्हतं. ए-1 गल्फ स्टोर इथे स्क्रॅच ऑफ तिकीट खरेदी केलं. लॉटरी विक्रेत्याच्या सांगण्यावरून त्याने हे तिकीट खरेदी केलं होतं. या तिकीटानं टोटो याचं नशीब उजळलं. त्याला काही सेकंदात कोट्यवधीची लॉटरी लागली.
टोटोला याआधीही अशाच प्रकारे 2017मध्ये विक्रेत्याच्या सांगण्यावरून तिकीट खरेदी केल्यानं लॉटरी लागली होती. 2017 मध्ये स्क्रॅच-ऑफ तिकीटवर 1$ मिलियन रुपये जिंकला होता. दोन वेळा लॉटरी जिंकल्यामुळे लोकांनाही खूप मोठं आश्चर्य वाटलं आहे.