सांगता काय... लोणच्याच्या एका छोट्याश्या फोडीची किंमत तब्बल 5 लाख रुपये?

ऐकालं ते नवल... 5 लाख रुपये किंमत असणाऱ्या लोणच्याच्या छोट्या फोडीमध्ये नक्की आहे तरी काय?  

Updated: Nov 3, 2022, 03:39 PM IST
सांगता काय... लोणच्याच्या एका छोट्याश्या फोडीची किंमत तब्बल 5 लाख रुपये? title=

मुंबई : सोशल मीडियावर रोज अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. पण काही गोष्टी अशा असतात ज्या कायम चर्चेत राहतात. आज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे लोणच्याची छोटी फोटो. ही लोणच्याची फोड इतर लोणच्याच्या फोडींसारखी नाही, या छोट्या लोणच्याच्या (pickles) फोडीची किंमत जवळपास 5 लाख रुपये आहे. एवढ्या छोट्या लोणच्याच्या फोडीची किंमत 5 लाख रुपये आहे. पण ही लोणच्याची फोड एवढी महागडी का? असा प्रश्न देखील तुम्हाला नक्कीच पडला असेल. (pickle recipe)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या लोणच्याची फोटो छताला चिटकवण्यात आली आहे. सीलिंगला चिपकलेल्या या फोडाची किंमत NZ$10,000 म्हणजे तब्बल 4 लाख 92 हजार रुपये आहे. (small batch dill pickles)

फक्त लोणच्याची नाही एक आर्टवर्क
ही लोणच्याची फोटो फक्त फोड नसून एक आर्टवर्क (artwork) आहे. न्यूझीलँडच्या ऑकलँडमध्ये होणाऱ्या ललित कला सिडनी प्रदर्शनातील चार आर्टवर्कपैकी हे एक आर्टवर्क आहे. महत्त्वाचं म्हणजे या लोणच्याच्या फोडीचा लिलाव लागला आहे. (mango pickles)

 लोणचाच्या फोडीला 'पिकल' असं नाव दिलं

इन्स्टाग्राम पेजवरही लोणच्याच्या फोडीसह माहिती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन कलाकार मॅथ्यू ग्रिफिन यांचं हे आर्टवर्क आहे. मॅथ्यू  यांनी लोणच्याची ही फोड कडोनाल्ड्सच्या चीज बर्गरमधून काढली होती. सॉसच्या मदतीने सिलिंगला चिटवलेल्या या छोट्या लोणचाच्या फोडीला 'पिकल' असं नाव दिलं.