सून शोधत आहे सासूसाठी Boyfriend, केवळ 2 दिवस एकत्र घालवल्यावर होईल मालामाल

 एका महिलेने बॉयफ्रेंड (Boyfriend on Rent) हवा आहे, अशी जाहिरात दिली आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे बॉयफ्रेंड तिच्यासाठी नसून तिच्या सासूसाठी  (Mother in Law) आहे. 

Updated: Jul 17, 2021, 07:46 AM IST
सून शोधत आहे सासूसाठी Boyfriend, केवळ 2 दिवस एकत्र घालवल्यावर होईल मालामाल

न्यूयॉर्क : अमेरिकेत (America) राहणाऱ्या एका महिलेने बॉयफ्रेंड (Boyfriend on Rent) हवा आहे, अशी जाहिरात दिली आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे बॉयफ्रेंड तिच्यासाठी नसून तिच्या सासूसाठी  (Mother in Law) आहे. ही जाहिरात सोशल मीडिया साइट रेडडिटवर व्हायरल होत असून लोकही वेगवेगळ्या प्रकारे कमेंट्स करीत आहेत. जाहिरातीमध्ये महिलेने लिहिले आहे की, तिला तिच्या सासूसाठी प्रियकर हवा आहे, तोही केवळ दोन दिवसांसाठी.

Marriageसाठी हजेरी लावावी लागेल

व्हायरल झालेल्या जाहिरातीमध्ये महिलेने  (Woman) लिहिले आहे की, तिला तिच्या सासूसाठी बॉयफ्रेंड (Boyfriend) हवा आहे आणि बनावट बॉयफ्रेंड होणाऱ्याला अवघ्या दोन दिवसांसाठी 72 हजार रुपये काय दिले जातील. न्यूयॉर्कच्या हडसन व्हॅलीमध्ये राहणाऱ्या या महिलेने जाहिरातीमध्ये म्हटले आहे की, मला माझ्या 51 वर्षांच्या सासूसाठी एका साथीदाराची गरज आहे. जो तिच्या लग्नात आणि डिनरमध्ये उपस्थित राहू शकेल. दोन दिवस त्याला आपल्या सासूबरोबर राहावे लागेल, यासाठी त्याला एक हजार डॉलर्स (अंदाजे 72 हजार रुपये) मिळतील.

जोडप्यासारखे (Couple) यावे लागेल

वास्तविक, या महिलेला एका विवाह सोहळ्याला हजेरी लावायची आहे. यासाठी तिला आपल्या सासूलाही सोबत घेण्याची इच्छा आहे. या लग्नाच्या मेजवानीत सासू सुंदर कपड्यांमधील जोडप्यासारखी दिसली पाहिजे, अशी तिची इच्छा आहे. क्रेगलिस्टच्या जाहिरातीमध्ये असे म्हटले आहे की, सासू पांढरे कपडे परिधान करणार आहे. रेंटवर घेतलेल्या बॉयफ्रेंडला त्यांच्यासोबत असताना दाम्पत्यासारखे वागावे लागेल.

बॉयफ्रेंडच्या वयाचा उल्लेखही केला

या जाहिरातीमध्ये रेंटवर घेण्यात येणाऱ्या बॉयफ्रेंडचे वय देखील नमूद केले आहे. या महिलेचे म्हणणे आहे की तिला 40 ते 60 वर्षांच्या दरम्यानच्या पुरुषाची गरज आहे. ती चांगली डान्सर आहे आणि तिचे बोलणेही गोड आहे. रेडडिटवर ही जाहिरात व्हायरल झाल्यानंतर, यूजर्स वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. एका महिलेने टिप्पणीमध्ये लिहिले की जेव्हा मी हे वाचले तेव्हा मी लगेच माझ्या पतीचा विचार केला. दुसर्‍या यूजर्सने सांगितले, 'हे अवघड आहे, परंतु काहीवेळा ते ठीक असते. हा योग्य सौदा आहे. जेवण आणि प्रवासासाठी स्वतंत्र पैसे दिले जातात, यापेक्षा अधिक काय असू शकते?