मुंबई : सोशल मीडियावर अनेक मजेदार फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात. यापैकी काही ऑप्टिकल इल्यूजन्स असतात. ऑप्टिकल इल्यूजन्स चित्र अनेकदा आपल्याला विचार करायला भाग पाडतात. असंच एक चित्र समोर आलं आहे. ज्यामध्ये एका खोलीत कुत्रा लपला असून तो कुत्रा कुठे आहे हे तुम्हाला शोधावे लागणार आहे.
खरं तर या चित्रात बऱ्याच गोष्टी दिसत आहे. हे एका खोलीचे चित्र आहे आणि त्यात एक काळा कुत्रा बसला आहे. हा कुत्रा शोधा आणि तो कुठे आहे ते सांगा. ऑप्टिकल इल्यूजन्स असणारे हे चित्र मेंदूला चक्रावून सोडणारे आहे. अशी चित्रे मानवी मेंदूचे निरीक्षण कौशल्य वाढवण्यास मदत करतात. इतकंच नाही तर ऑप्टिकल भ्रम शास्त्रज्ञांना चित्राबद्दल बोलत असताना आपला मेंदू कसा काम करतो हे समजण्यास मदत करतो.
या फोटोची गंमत म्हणजे इथे एक कुत्रा उभा असूनही तो अजिबात दिसत नाही. एक सामान खाली पडलेले दिसत आहे, पण तो कुत्रा नाही. यामुळे हा कुत्रा सहजासहजी दिसणार नाही. पण जर तुम्हाला तो सापडला तर तुम्ही जिनियस आहात हे मानलं जाईल.
प्रत्यक्षात हा कुत्रा खोलीचा काळा भाग असलेल्या ठिकाणी दिसतो. हा कुत्रा देखील काळा असून अंधार असल्यामुळे तो नीट दिसू शकत नाही आहे. परंतु नीट पाहिलं तर त्याला ओळखले जाऊ शकते.