Viral Video of Elephant: सोशल मीडियात अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक हत्तींचा व्हिडीओ सध्या प्रत्येकजण एकमेकांना पाठवतोय. यामागंच कारणही तसंच आहे. जंगलातील रस्त्यावर एक ट्रक बंद पडलाय. त्याचे चालक-वाहक ट्रकचा टायर बदलण्यात व्यस्त आहेत. पण दुसरीकडे हत्तींची स्वारी या ट्रकावर तुटून पडली आहे. हत्तीचे हे कृत्य पाहून सोशल मीडियात लाईक्स, कमेंट्सचा पाऊस पडताना दिसतोय.
त्याचे गोलमटोल दिसणे, शांत स्वभाव यामुळे हत्ती हा प्राणी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. हत्तींचे छान छान व्हिडीओ लहान मुलेदेखील पाहत असतात. दरम्यान द वेस्ट आफ्रीकन मॅन नावाच्या हॅंडलवरुन हत्तींचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हत्ती खूप आरामात आणि शांततेत संत्री खातायत. एक हत्ती म्हणून काय दिवस आहे...हत्तींच्या लूटीने ट्रक खराब केलाय, अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओवर दिली आहे. हा व्हिडीओ दक्षिण आफ्रिकेचा असल्याचे सांगितले जात आहे.
संत्र्याची डिलीव्हरी करणारा व्हिडीओ जंगल मार्गातून जात होता. तितक्यात त्याचे चाक खराब झाले. बाजुनेच हत्तींचा कळप जात होता. भुकेलेल्या हत्तींसाठी ही आयती संधी चालून आली होती. एका हत्तीने ट्रकमधील संत्र्यांचा फडशा पाडायला सुरुवात केली. त्यानंतर एकामागोमाग एक सर्वच हत्ती संत्र्याची गाडी लुटू लागले. तसं पाहायला गेलं तर यामुळे संत्री मालकाचं मोठं नुकसान झालंय पण हत्तींवर सर्वचजण प्रेम करत असल्याने इंटरनेट विश्वात ही गोष्ट फार हलक्यात घेण्यात आलीय.
हा व्हिडीओ आतापर्यंत 60 हजारहून अधिक जणांनी लाईक केलाय. नेटिजन्स यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत. काहीजण याची तुलना स्विगी आणि झोमॅटोसोबत करत आहेत. येथे प्राण्यांची ऑनलाइन डिलीव्हरी सर्विस सुरु आहे. तर हा ट्रक खराब झाला नाहीय तर हत्तींनी तोडफोड केलीय अशी कमेंट दुसऱ्या एका युजरने केली आहे.
तिसऱ्या एका युजरने आणखी एक मेजशीर कमेंट केलीय. हत्ती भर रस्त्यात हफ्ता वसूली करत असल्याचे त्याने म्हटलंय. तर हत्तींना जंगल टॅक्स द्यावा लागतो अशी कमेंटही काहींनी केलीय.