600 तासात 23 लाख KM चा प्रवास; चंद्रावर जाऊन रिटर्न आले नासाचे स्पेसक्राफ्ट

नासाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत Orion spacecraft चंद्रावर पुन्हा पृथ्वीवर परतत आहे. 

वनिता कांबळे | Updated: Dec 17, 2023, 11:26 PM IST
600 तासात 23 लाख KM चा प्रवास; चंद्रावर जाऊन रिटर्न आले नासाचे स्पेसक्राफ्ट title=

Orion spacecraft Video: चंद्रावर स्वारी करण्याचे मानवाचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहे. भविष्यात चंद्राची सफर करुन पुन्हा पृथ्वीवर परत येणे देखील शक्य होणार आहे. कारण,  600 तासात 23 लाख KM चा प्रवास करुन  नासाचे स्पेसक्राफ्ट चंद्रावर जाऊन पृथ्वीवर परत येणार आहे. यामुळे भविष्यात मानवाला चंद्रावर नेण्याच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने नासाची ही मोहिम अत्यंत महत्वाचा टप्पा ठरणार आहे. 

अमेरिकन अंतराळ संस्था नासाची आर्टेमिस-1 मोहिमे चांगलीच चर्चेत आली आहे.  चंद्रावर जाऊन रिटर्न आलेल्या नासाच्या स्पेसक्राफ्टच्या यशाची ही वर्षपूर्ती आहे. नासाच्या ओरियन  महिमेच्या वर्षपूर्ती निमित्ताने एक खास व्हिडिओ शेअर करण्यात आला. वर्षभरापूर्वी 11 डिसेंबर 2022 रोजी ओरियन हे स्पेसक्राफ्ट 25 दिवसांत 22 लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून  पृथ्वीवर परत आले होते. 

नेमकं कसं आहे Orion spacecraft

नासाने Orion spacecraft च्या लँंडिगचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.  11 डिसेंबर 2022 रोजी ओरियन हे स्पेसक्राफ्ट चंद्रावर स्वारी करुन पृथ्वीवर परतले होते. ओरियन स्पेसक्राफ्टने पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केला तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. पृथ्वीवर परत येण्याच्या वेळी ओरियनचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा 32 पट जास्त होता. ओरियन हे नासाचे भविष्यातील स्पेसक्राफ्ट आहे. अंतराळवीरांना अंतराळात नेण्यासाठी Orion spacecraft तयार करण्यात आले आहे.

नासाने शेअर केला  Orion spacecraft चा व्हिडिओ

Orion spacecraft चा व्हिडिओ शेअर करताना नासाने या मोहिमेची माहिती देखील शेअर केली आहे. ओरियन स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करत असताना 2,800 अंश सेंटीग्रेड तापमानाचा सामना करावा लागला. या मोहिमेत ओरियन कॅप्सूलचे उष्मा शील्डही तपासण्यात आले. ही मोहिम यशस्वी जाली आहे. 2014 मध्ये याची पहिली चाचणी घेण्यात आली होती. त्या वेळी जेव्हा ते पृथ्वीच्या कक्षेतून परतले तेव्हा त्याचा वेग ताशी 20 हजार मैल इतका होता.
आर्टेमिस मोहिमेअंतर्गत मानवाला चंद्रावर पाठवण्याचे नासाचे उद्दीष्ट्य आहे.  या मोहिमेअंतर्गत अंतराळात जाणारी व्यक्ती चंद्राला प्रदक्षिणा घालूनच पृथ्वीवर परतणार आहे.
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by NASA (@nasa)