VIDEO: समुद्राच्या पोटात दडलंय तरी काय?

जगातील सर्वात खोल प्रशांत महासागरचा व्हिडिओ समोर आला आहे. 

Updated: May 15, 2019, 01:00 PM IST
VIDEO: समुद्राच्या पोटात दडलंय तरी काय? title=

नवी दिल्ली : भारतासह संपूर्ण जगाला प्लॉस्टिकने विळखा घातलेला आहे. प्लॉस्टिकचा जगभरातूनच सर्रास वापर केला जात आहे. प्लॉस्टिकच्या वापराचे दुष्परिणाम माहित असूनही जगभरातून याच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात अपयश येत आहे. आतापर्यंत समुद्रतील किनाऱ्यावर पाण्यातील प्लॉस्टिक तरंगत असतानाचे अनेक फोटो पाहण्यात आले आहेत. परंतु आता हे प्लॉस्टिक केवळ समुद्राच्या पाण्यावरच नाही तर समुद्राच्या तळाशी जाऊन पोहचले आहे. 

जगातील सर्वात मोठा, खोल प्रशांत महासागरचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. १ मे रोजी अभ्यासक विक्टर वेसकोवो प्रशांत महासागरच्या ११ किलोमीटरपर्यंत असणाऱ्या पृष्ठभागावर गेले होते. त्यांनी या महासागराच्या पृष्ठभागावर ४ तास होते. या टीमने महासागराच्या ११ किलोमीटर खाली गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात कचरा बाहेर काढला. तसेच विविध प्रकारच्या झुडपांच्या प्रजातींचा शोध लागला.

हा व्हिडिओ पाहण्यासाठी जितका सुंदर आहे, तितकाच याबाबतच्या गोष्टींवर केला जाणारा विचार अतिशय भयावह आहे. काही दिवसांपूर्वी अभ्यासक विक्टर वेसकोवो आणि त्यांची टीम सबमरिन डाइवच्या साहाय्याने समुद्रात सर्वात खोल प्रशांत महासागराच्या खाली गेले होते. त्यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्लॉस्टिक बाहेर काढले. त्याशिवाय समुद्रात खोलवर झुडपं आणि खडकांमध्ये अडकलेले चॉकलेटची पाकिटं, प्लॉस्टिक पिशव्याही आढळल्या होत्या. भारतासह संपूर्ण जगच या प्लॉस्टिकच्या विळख्यात अडकलं असून यावर मार्ग काढण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु आहेत. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात असणाऱ्या प्लॉस्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात अद्याप यश मिळालेलं नाही. धोकादायक प्लॉस्टिकचा वापर टाळण्यासाठी विविध स्तरातून यासाठी पर्यावरणपूरक पर्याय शोधण्याचं काम सुरु आहे.