इस्लामाबाद : पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मदचा मोरक्या मसूद अझरने स्विकारली होती. हा हल्ला आम्हीच घडवून आणल्याचा दावा केला. त्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैशच्या दहशतवादी तळांना टार्गेट केले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाद टोकाला गेलेत. तर अमेरिकेने दहशतवादाला खतपाणी घालू नका, कारवाई करा अशी तंबी दिली होती. तसेच भारतानेही मसूद अझरवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, मसूद पाकिस्तान नाही असे सांगण्यात आले. नंतर पाकिस्तान परराष्ट्र मंत्र्यांनी मसूद पाकिस्तान असून तो आजारी असल्याचे म्हटले होते. जैशचे कार्य हे पाकिस्तानमधून चालविण्यात येत आहे. असे असताना पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी जैश ए मोहम्मदचे देशात अस्तित्वच नाही, असे म्हटले आहे.
Pakistan Army claims Jaish-e-Mohammed 'does not exist' in the country
Read @ANI Story | https://t.co/OrwqJoxKcr pic.twitter.com/yDcNvG9ABM
— ANI Digital (@ani_digital) March 6, 2019
मसूद अझहरची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे अस्तित्व पाकिस्तानामध्ये नाहीच, असा दावा आता पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते असिफ गफूर यांनी 'सीएनएन' या वृत्तवाहीनीला दिलेल्या एका मुलाखातीत तसा दावा केला आहे, असे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने केला आहे. दरम्यान, पाकिस्तानने असा दावा केला असताना पाकिस्तानचे परराष्ट मंत्री महमूद कुरेशी म्हणाले होते की, मसूद अझर पंतप्रधान इम्रान खान यांच्या संपर्कात आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या नव्या दाव्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.