नवी दिल्ली : पाकिस्तानने कुलभूषण जाधव प्रकरणात स्वत:च्याच अडचणी वाढवल्या आहेत. त्यामुळे भारताला पाकिस्तानला घेरण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात आतंरराष्ट्रीय न्यायालयच्या (आयसीजे) निर्णयाच्या बाजुने मतदान केलं आहे. कुलभूषण जाधव प्रकरणात भारत आयसीजेमध्ये गेली होती. कथित भारतीय गुप्तहेर असल्याचा आरोप लावून मृत्यूची शिक्षा आणि राजनैतिक अधिकार न दिल्याच्या विरोधात भारताने याचिका दाखल केली होती.
भारताने निवेदनात 2004 चं अवेना प्रकरण आणि इतर मॅक्सिकन नागरिकांच्या प्रकरणाचा हवाला दिला. या प्रकरणात आयसीजीने अमेरिकेला दोषी ठरवलं होतं. अमेरिकेने मॅक्सिकोच्या त्या नागरिकांना राजनैतिक अधिकार दिला नव्हता आणि या नागरिकांना मृत्यूची शिक्षा सुनावली होती.
एका रिपोर्टनुसार पाकिस्तानने भारतासह इतर 68 देशांसोबत संयुक्त राष्ट्राच्या एका प्रस्तावाच्या बाजुने मत दिलं होतं. द्यामध्ये अवेना प्रकरणात आलेल्य़ा निर्णयाला लगेचच आमंलात आणण्याची गोष्ट म्हटली होती. 14 वर्षानंतर देखील अमेरिकेने आयसीजेचा हा निर्णय मान्य केला नव्हता. आयसीजे संयुक्त राष्ट्राचा एक भाग आहे. जाधव प्रकरणात आता फेब्रुवारी महिन्यात सुनावणी होणार आहे. याआधी आयसीजेने जाधवला मृत्यू दंड देण्याच्या निर्णयाला स्थिगिती दिली आहे.
पाकिस्तानने अवेना प्रकरणात मॅक्सिकोच्या नागरिकांची सूटका करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावाच्या बाजुने मत दिलं पण मग हिच गोष्ट कुलभूषणच्या प्रकरणात पण लागू होते. पाकिस्तानचं मत मग वादात सापडतं. कारण जी गोष्ट अमेरिकेने मॅक्सिकोच्या नागरिकांच्या बाबतीत केली तीच गोष्ट पाकिस्तानने कुलभूषण जाधवच्या प्रकरणात केली. पाकिस्तानने जाधवला राजनैतिक अधिकार न दिल्याने विएना संधीचं उल्लंघन केलं आहे.