पाकिस्तान निवडणूक २०१८ : महिला राजकारण्यांकडे 'भारतीय' कसे पाहतात?

 सोशल मीडियावर भारतीय महिला नेत्यांची तुलना पाकिस्तानी महिला उमेदवारांसोबत केलेली दिसून आली

Updated: Jul 26, 2018, 10:15 AM IST
पाकिस्तान निवडणूक २०१८ : महिला राजकारण्यांकडे 'भारतीय' कसे पाहतात? title=

मुंबई : पाकिस्तानात २५ जुलै रोजी तिसऱ्यांदा निवडणूक पार पडल्या. या निवडणुकी दरम्यान अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले... अनेकांनी बोलताना आपल्या मर्यादा ओलांडल्या... आजपर्यंतची 'सर्वात घाणेरडी निवडणूक' म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जातंय. हेच सोशल मीडियावरही पाहायला मिळतंय. पाकिस्तानच्या या निवडणुकीत महिलांचा सहभागही उल्लेखनीय होता. यासाठी पाकिस्तान निवडणूक आयोगाची महत्त्वाची भूमिका होती. प्रत्येक पक्षात ५ टक्के महिला उमेदवार असतील, असे आदेशच निवडणूक आयोगानं दिले होते. त्यामुळे, या निवडणुकीत २७२ सामान्य जागांवर तब्बल १७१ जागांवर महिला उमेदवार उभ्या होत्या.

एकीकडे पाकिस्तानमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू होती... तर दुसरीकडे भारतीयांचंही या निवडणुकीकडे लक्ष होतं. त्यामुळेच, सोशल मीडियावर भारतीय महिला नेत्यांची तुलना पाकिस्तानी महिला उमेदवारांसोबत केलेली दिसून आली. 

सोशल मीडियावर काही वक्तव्य करताना, आपण अप्रत्यक्षपणे महिला नेत्यांना गौण लेखत त्यांच्यावर लिंगभेदावर आधारित टीका करत असल्याचं अनेकांच्या गावीही नव्हतं. 

यांतील अनेक ट्विटसमध्ये मायावती आणि ममता बॅनर्जी यांच्या फोटोंचा वापर करण्यात आला. 

मायावती या उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आहेत... तर दुसरीकडे ममता बॅनर्जीही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री राहिल्यात.

यामुळे, आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकारणात महिलांचा सहभाग वाढलेला दिसत असला तरी काहींच्या दृष्टीकोनात मात्र अजूनही फारसा फरक पडलेला जाणवत नाही... आणि हीच दुर्दैवी बाब आहे.