नवी दिल्ली : अखेर पाकिस्तान सरकारला शहाणपण सूचलं आहे. संयुक्त राष्ट्रानं जाहीर केलेल्या पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर पाकिस्तान सरकार कारवाई करणार असल्याची माहिती पाकिस्तान सरकारच्या सूत्रांनी विऑन या वृत्तवाहिनीला दिली आहे. तसंच संयुक्त राष्ट्रेनं जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझरचं नाव दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केला तर विरोध करणार नसल्याचंही पाकिस्तान सरकारनं सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं हे मोठं यश मानलं जातं आहे. पुलवाम्यातील हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवरील आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्यासाठी जोरदार रणनिती आखली होती. पाकिस्ताननं दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्रांनीही पाकिस्तानवर दबाव वाढवला होता. त्यानंतर पाकिस्ताननं ही भूमिका घेतल्याची चर्चा आहे.
२ दिवसाआधी मसूदचा मृत्यू झाला असं बोललं जात होतं. जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर हा जिवंत असल्याची माहिती झी मीडियाच्या इस्लामाबादमल्या प्रतिनिधीने दिली आहे. मसूद अजहर जिवंत असून त्याचा व्हीडिओ संदेश लवकरच प्रसारित केला जाईल असं जाहीर कऱण्यात येतं आहे. मसूदच्या जवळच्या नातलगांकडूनही हीच माहिती आहे. मसूद अजहर मेल्याची माहिती काल अनेक भारतीय माध्यमांमध्ये प्रसारीत झाली होती. मात्र मसूद जिवंत आहे. मसूद मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त आहे. त्याच्यावर डायलिसीसचे उपचार सुरू आहेत. जानेवारीनंतर त्याची तब्येत सातत्याने खालावत आहे. अटक या ठिकाणी गुप्त जागी मसूद लपला असल्याची माहिती आहे.