वाढती महागाई; या मंत्र्यांचा अजब सल्ला, म्हणाले अन्न कमी खा!

Rising inflation : सध्या लोकांना महागाईचा ( inflation) सामना करावा लागत आहे. जनता त्रस्त आहे. त्यामुळे सरकारला जनतेचा रोष पत्करावा लागत आहे.  

Updated: Oct 12, 2021, 02:45 PM IST
वाढती महागाई; या मंत्र्यांचा अजब सल्ला, म्हणाले अन्न कमी खा! title=

इस्लामाबाद : Rising inflation : सध्या लोकांना महागाईचा ( inflation) सामना करावा लागत आहे. जनता त्रस्त आहे. त्यामुळे सरकारला जनतेचा रोष पत्करावा लागत आहे. यातच एका मंत्र्याने अजब विधान केले आहे. वाढती महागाई रोखण्याऐवजी नागरिकांनाचा सल्ला दिला आहे. महागाई वाढत असल्याने अन्न कमी खा, असा सल्ला दिला आहे.

पाकिस्तानात वाढती महागाई (Rising inflation in Pakistan ) सामान्य लोकांसाठी तसेच सरकारसाठी अडचणीचे कारण बनली आहे. खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. पण जखमेवर मलम लावण्याऐवजी सरकार त्यावर मीठ चोळण्याचा प्रयत्न करत आहे.(Rising inflation in Pakistan has become a cause of trouble for the common people as well as the government.) पाकिस्तानचे फेडरल मंत्री अमीन गंदापूर यांनी अलीकडेच महागाई संदर्भात असे विधान केले आहे, ज्यामुळे लोकांचा संतपा झाला असून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या विधानाने जनतेची अधिक निराशा झाली आहे.

मंत्र्यांनी दिला कमी खाण्याचा सल्ला

महंगाई की मार झेल रही पाकिस्तानी जनता, मंत्री बोले- खाना कम खाओ

जिओ टीव्हीच्या बातमीनुसार, पाकिस्तान सरकारमधील गिलगित-बाल्टिस्तान व्यवहार मंत्री अमीन गंदापूर यांनी एका जाहीर सभेला संबोधित करताना लोकांना कमी खाण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की आपण देशासाठी इतका त्याग करू शकत नाही का? जर मी चहामध्ये 100 दाणे साखर घातली आणि 9 दाणे कमी घातले तर चहा कमी गोड होईल का? जर मी भाकरीचे 100 तुकडे खात असेन आणि त्यातील मी 9 तुकडे कमी खाऊ शकत नाही?

मंत्री पुढे म्हणाले की, जर 9 टक्के महागाई असेल तर मी माझ्या समाजासाठी, माझ्या मुलांसाठी इतका त्याग करू शकत नाही का? ते म्हणाले की पाकिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी आणि आपल्या मुलांना गुलामगिरीतून वाचवण्यासाठी आपल्याला त्याग करावा लागेल. आता तुम्ही लोकांनी हा निर्णय घ्यावा. मंत्री महोदयांनी बुधवारी हे वक्तव्य केले आहे. परंतु आता ते सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे आणि लोक त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत.

पाकिस्तानमधील चिंताजनक परिस्थिती

पाकिस्तानमधील नेत्यांनी अशी वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनीही पाकिस्तानी लोकांना कमी भाकरी खाण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय, पीटीआयचे नेते रियाज फत्याना यांनीही अमीन गंदापूरसारखेच विधान केले.

वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवणे हे शेजारील देश पाकिस्तानमध्ये मोठे आव्हान बनले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी गेल्या महिन्यात एक बैठक घेतली आणि खाद्यपदार्थांच्या किमती नियंत्रित करण्याबाबत विचारमंथन केले. याशिवाय, आयएमएफने पाकिस्तानला इशारा देखील दिला आहे की तेथील परिस्थिती खूप चिंताजनक आहे, जरी सरकार या दिशेने योग्य पावले उचलत आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानमध्ये ग्राहक वस्तूंच्या किमती वाढीच्या नवीन विक्रमाला स्पर्श केला आहे. याचे कारण वाढती महागाई आहे, जी ऑगस्टच्या तुलनेत 8.4 टक्क्यांवरून 9 टक्के झाली आहे.