चांद नवाबला तोडीस तोड! हा व्हिडीओ पाहून तुम्हीच म्हणाल अरे देवा हे काय?

अक्कल बडी की भैंस बडी! हम बाजीगर म्हणत पाकिस्तानच्या पत्रकारानं चक्क घेतली म्हशीची मुलाखत

Updated: Jul 24, 2021, 08:51 PM IST
चांद नवाबला तोडीस तोड! हा व्हिडीओ पाहून तुम्हीच म्हणाल अरे देवा हे काय?

मुंबई: चांद नवाबचा आपल्या रिपोर्टींगसाठी खूप प्रसिद्ध आहे पण त्याला तोडीस तोड उत्तर देणारा एक व्यक्ती सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. या रिपोर्टनं चक्क म्हशीसोबत लाईव्ह संवाद साधला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

पाकिस्तानच्या या पत्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या पाकिस्तानच्या पत्रकाराने ईद-उल-अजहा निमित्तानं चक्क म्हशीची मुलाखत घेतली आहे. अमीन हफीज असं या पत्रकाराचं नाव आहे. अमीन हफीज यांनी म्हशीला आता तुला कसं वाटतंय असा चक्क प्रश्न विचारला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक युझर्सनी भुवया उंचावल्या आहे. 

ही म्हैस कुर्बानीसाठी आहे का? असा प्रश्न अमीन हफीज विचारतात. त्यावेळी म्हशीसेजारी उपस्थित असलेल्या व्यक्तीला विचारला. त्यावेळी हो हो म्हणाल्यावर हफीजने लगेच म्हशीसमोर माईक धरून तुला कसं वाटतंय हा प्रश्न विचारला. त्यावर म्हशीनं हम्मा केलं. आपल्या परिनं हफीजने अर्थ लावला आणि पुढे मुलाखत सुरू ठेवली. याआधीने हफीजने सांडची मुलाखत घेतली होती. त्याचे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.