येथे मृतदेहासोबत उत्सव साजरा करण्याची अजब परंपरा...या मागचे कारण काय?

या समुदायातील लोकं डेड हार्वेस्ट फेस्टिव्हल साजरा करतात.

Updated: Jul 24, 2021, 08:21 PM IST
येथे मृतदेहासोबत उत्सव साजरा करण्याची अजब परंपरा...या मागचे कारण काय? title=

मुंबई : कोणत्याही मृत्यू झालेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्यात येते. काही दिवसांनी त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी काही पूजा करण्यात येते, त्यानंतर जो तो आपआपल्या आयुष्यात व्यस्त होऊन जातो. मृत्यू झालेली व्यक्ती आपल्या कितीही जवळची व्यक्ती असली तरी आपण त्याला आपल्या जवळ ठिऊ शकत नाही आणि हाच नियतीचा नियम आहे. परंतु असा एक समाज आहे, ज्यामध्ये हे लोकं मेलेल्या व्यक्तीला आपल्या जवळ ठेवतात. एवढेच काय तर हे लोकं त्यांच्या सोबत डेड हार्वेस्ट फेस्टिव्हल साजरा करतात.

तुम्ही कधीही याचा विचार केला आहे की, जगात अशी कोणती जागा आहे, जेथे लोकं त्यांच्या पूर्वजांच्या मृतदेहांसह राहतात? जगात एक असा देश आहे जेथे लोकं त्यांच्या मृत्यूनंतर आपल्या कुटुंबातील सदस्यांना कधी स्वत:पासून दुर देत नाहीत. मृतांचे मम्मीच्या रूपात रूपांतर झाल्यानंतर ते त्यांना घरीच ठेवतात.

मेलेल्यांना लोकांबरोबर ठेवण्याची परंपरा इंडोनेशियातील तोराजन समाजात पाहायला मिळते. या समुदायातील लोकं डेड हार्वेस्ट फेस्टिव्हल साजरा करतात. या दिवशी, ते मृत लोकांना त्यांच्या पूरलेल्या बॉक्समधून बाहेर काढतात आणि त्यांना आंघोळ घालून नवीन कपडे देखील घालतात. त्यानंतर ते मेलेल्या माणसाच्या आवडीचे खाद्य पदार्थ देखील बनवतात आणि त्याला खायला देतात.

ज्या तारखेला लोकंचे हे पूर्वज मेले आहेत, त्या तारखेला त्यांना बाहेर काढले जाते, त्यानंतर त्यांना अंघोळ घालून सजवले जाते, त्या दिवशी ते आपल्या नातलगांना आणि मित्रांनाही कॉल करुन घरी बोलवतात. यानिमित्ताने त्यांच्या घरात उत्सवाचे वातावरण आहे.

इंडोनेशियातील तोराजन पंथातील लोकांचा असा विश्वास आहे की मृत्यू हा जीवनाचा शेवट नाही. तसेच मेलेले लोकं हे जिवंत असतात. त्यामुळे हे लोकं मेलेल्यांना आपल्या बरोबरच ठेवत नाहीत, तर त्यांना भोजनही देतात. या पंथात जेव्हा कुणाचाही मृत्यू झाला तरी त्याला पुरले जात नाही, या उलट हे लोकं एका म्हशीचा बळी देतात. म्हशीचा बळी दिल्यानंतर मृतदेह घरी नेला जातो. यानंतर, त्याला धान्यगृहात आणि नंतर स्मशानभूमीत नेण्यात आले.

त्यानंतर पुन्हा हा मृतदेह परत घरी आणला जातो. त्यांच्यासाठी एक खोली रिकामी केली जाते. या खोलीत या व्यक्तीची प्रत्येक आवश्यक वस्तू, कपडे आणि आवडीच्या वस्तू ठेवल्या जातात. मृत शरीराचे बर्‍याच वर्षांपर्यंत जतन करण्यासाठी, हे लोकं मृतदेह फॉर्मल्डहाइड आणि पाण्यात मिक्स करुन त्याला मृतदेहला लावतात आणि नंतर या मृतदेहाला परिवारात आणतात.

येथे लोक मृत्यूला एखाद्या सणाप्रमाणे साजरे करतात. या मृतदेह संपूर्ण गावाच्या मार्गावर फिरवले जाते गावाच्या या परंपरेला 'माइनेने' म्हणतात.