दिवाळखोर पाकिस्तानवर भीक मागण्याची वेळ, पाकिस्तानी रुपयाची दुर्दशा

पाकिस्तानी जनतेच्या हालाखीच्या स्थितीत आणखी भर पडणार 

Updated: Oct 11, 2018, 09:05 AM IST
दिवाळखोर पाकिस्तानवर भीक मागण्याची वेळ, पाकिस्तानी रुपयाची दुर्दशा  title=

नवी दिल्ली : पाकिस्तानातलं लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेल्या इम्रान खान सरकार अक्षरशः भीकेला लागलंय. देश चालवण्यासाठी आवश्यक निधी कमी पडत असल्यानं इम्रान खान सरकारनं पंतप्रधानांच्या घरी पाळलेल्या म्हशी २३ लाखांना विकल्या. सरकारी मालकीच्या उच्चभ्रू गाड्यांचा लिलाव करून काही कोटींची कमाई केली. पण अर्थव्यवस्थेला पडलेलं खिंडार काही केल्या बुजत नाहीय. 

आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडे पाकिस्ताननं कर्ज मागितलंय. आता हे कर्ज मिळालं तर ठिक... नाहीतर पाकिस्तानी जनतेच्या हालाखीच्या स्थितीत आणखी भर पडणार आहे. 

गेल्या दोन तीन दिवसात डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची विक्रमी घसरण झालीय. एका अमेरिकन डॉलरसाठी १३२ पाकिस्तानी रुपये मोजावे लागत आहेत. 

येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत पाकिस्तानला ८ अब्ज डॉलरच्या कर्जाची परतफेड करायची आहे. जर पाकिस्तान हे कर्ज फेडू शकला नाही, तर देशाला कर्जबुडव्या देश अशी उपाधी मिळणार आहे. 

म्हणूनच आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडे पाकिस्ताननं विशेष मदतीची याचना केलीय.