पाकिस्तानचे 'हे' तीन प्रमुख टेरर रूट, भारतात अतिरेकी घुसवण्याचा प्रयत्न

पाकिस्तानची (Pakistan,) ISI ही लष्करी गुप्तहेर संघटना भारतात ( India) अतिरेकी (terrorists) घुसवण्याचे हरतऱ्हेने प्रयत्न करत आहे.

Updated: Feb 21, 2021, 08:22 PM IST
पाकिस्तानचे 'हे' तीन प्रमुख टेरर रूट, भारतात अतिरेकी घुसवण्याचा प्रयत्न  title=

राजू केरनीसह ब्युरो रिपोर्ट / जम्मू-काश्मीर : पाकिस्तानची (Pakistan,) ISI ही लष्करी गुप्तहेर संघटना भारतात ( India) अतिरेकी (terrorists) घुसवण्याचा हरतऱ्हेनं प्रयत्न करत असते. अतिरेकी किंवा किमान हत्यारं पाठवण्यासाठी अतिरेक्यांचे हे मालक वेगवेगळे मार्ग वापरत आहेत. बघुयात पाकिस्तानचे हे तीन प्रमुख टेरर रूट. (Pakistan's three main terror routes, attempts to infiltrate terrorists into India)

रूट नंबर 1 - सीमेच्या खालून भुयार 

जम्मूच्या कठुआ जिल्ह्यात जानेवारीमध्ये हे भुयार बीएसएफला सापडलं. पाकिस्तानमधील शक्करगड इथून हे भुयार खोदण्यात आलं होतं. भारतात अतिरेकी घुसवण्यासाठीच हा मार्ग तयार केल्याचं उघड आहे. 

हे दुसरं भुयारही आंतरराष्ट्रीय सीमेजवळ हीरानगर सेक्टरमध्ये सापडलंय. या भुयाराचं दुसरं टोकही पाकिस्तानमध्येच आहे. अशी अनेक भुयारं बीएसएफनं वेळोवेळी शोधलीयेत आणि उद्ध्वस्त केली आहेत. 

20 ऑगस्ट 2020 रोजी सांबा सेक्टरमध्ये एक भुयार आढळून आलं होतं. 24 नोव्हेंबरलाही याच भागात बॉर्डर पोस्टजवळ 160 फूट लांबीचं भुयार सापडलं. 

रूट नंबर 2 - सीमापार जाणारे नदी-नाले

जम्मूमधील टरना नाला आणि बसंतर या नद्या सीमा ओलांडून वाहतात. अतिरेक्यांच्या घुसखोरीचा हा राजमार्ग आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 

रूट नंबर 3 - ड्रोनमधून हत्यारं 'एअरड्रॉप' 

ही दृष्यं आहेत गेल्या वर्षीच्या जून महिन्यातील. बीएसएफने पाकिस्तानचं एक हेक्झाचॉपर पाडलं. या हेलिकॉप्टरमध्ये हत्यारांचा मोठा साठा आढळून आला. जम्मूमध्ये असलेल्या अतिरेक्यांसाठी ही हत्यारं एअरड्रॉप करण्याची योजना होती. 

याखेरीज काश्मीरमधील अतिरेक्यांना बिहारमधून शस्त्रपुरवठा होत असल्याचंही एका अतिरेक्याच्या चौकशीत नुकतंच समोर आलं होतं. अतिरेक्यांना अर्थपुरवठ्यासाठी पाकिस्तानातून अमली पदार्थांचीही मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचंही वारंवार उजेडात आलंय. पाकिस्तानचे हे सगळे टेरर रूट उद्ध्वस्त करणं हे भारतासमोरचं लक्ष्य आहे.