Wedding Story : पोलंडच्या तरूणीने भारतीय तरूणासोबत बांधली लग्नगाठ, Love Storyची सोशल मीडियावर चर्चा

Marriage Story : भारताचा ईशान गोयल हा एक युट्यूबर (Youtuber) आहे. तो अनेक देशांमध्ये प्रवास करत असताना व्हिडिओ ब्लॉग बनवतो. जून 2017 साली बीबीए दरम्यान तो इंटर्नशिपच्या उद्देशाने पोलंडला गेला होता. इंटर्नशीप (Internship) दरम्यान त्याची मैत्री पाशा या तरूणीसोबत झाली होती. 

Updated: Feb 3, 2023, 05:06 PM IST
 Wedding Story : पोलंडच्या तरूणीने भारतीय तरूणासोबत बांधली लग्नगाठ, Love Storyची सोशल मीडियावर चर्चा

Marriage Story : देशभरात लग्नाचा माहोल सूरू आहे. अनेक तरूण-तरूणी लग्न बंधनात (Wedding) अडकतायत. तसेच जागोजागी ढोल-नगाडे वाजतायत, लग्नाच्या वराती निघतायत. या सर्व लग्नाच्या वातावरणात अनेक लव्ह स्टोरी (Love Story) ही समोर येत आहेत. यातील एका लव्हस्टोरीची सोशल मीडियावर (Social media) चर्चा आहे. कारण या लव्हस्टोरीत एका पोलंडच्या तरूणीने भारतीय तरूणासोबत लग्नगाठ बांधलीय. नेमकी ही लव्हस्टोरी कशी आहे, ते जाणून घेऊयात. 

अशी झाली पहिली भेट

भारताचा ईशान गोयल हा एक युट्यूबर (Youtuber) आहे. तो अनेक देशांमध्ये प्रवास करत असताना व्हिडिओ ब्लॉग बनवतो. जून 2017 साली बीबीए दरम्यान तो इंटर्नशिपच्या उद्देशाने पोलंडला गेला होता. इंटर्नशीप (Internship) दरम्यान त्याची मैत्री पाशा या तरूणीसोबत झाली होती. या दरम्यान त्यांनी एका ट्रिपचा प्लॅन आखला होता. या ट्रिपच्या दिवशी तिची मैत्रिण वेरोनिकाचा वाढदिवस होता. त्यामुळे कदाचित पाशाला जाता येणार नव्हते. मात्र पाशाने वेरोनिकालाही या ट्रिपमध्ये सामील केले आणि अशाप्रकारे ईशान आणि वेरोनिकाची भेट झाली. 

वेरोनिकाने ईशानसोबत ट्रिपला जाण्यास होकार दिला होता.ती ईशानला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी भेटली होती. ईशानला पहिल्यांदा बस स्टँडवर पाहिलं होते, असे वेरोनिका म्हणाली. त्या दिवशी मी ईशानच्या क्रेडिट कार्डनेच केक कापला होता. माझा वाढदिवस खूप खास झाला. ईशान मला पहिल्याच भेटीत आवडला होता. कारण तो सर्वांशी मिळत मिसळत होता. त्यामुळे मला मनातल्या मनात ईशान आवडू लागल्याचे वेरोनिकाने सांगितले. ही ट्रिप पुर्ण केल्यानंतर दोघेही पोलंडला परतले. 

प्रेमाची कबूली

पॅरिसला (Paris)पोहोचल्यानंतर वेरोनिकासोबतचे त्याचे नाते अधिक घट्ट झाले. आम्ही एकत्र फिरायचो, आयफेल टॉवरजवळ तासनतास बसायचो, असे ईशान याने सांगितले. मात्र ट्रीप पुर्ण झाल्यानंतर वेरोनिकाला पोलंडला परतावे लागले आणि त्याला अॅमस्टरडॅमला यावे लागले. या दरम्यान त्याला वेरोनिकापासून दूर राहावेसे वाटले नाही. त्याने आपले सर्व सामानही वेरोनिकाच्या घरी सोडले होते. एके दिवशी अचानक तो वेरोनिकाला न सांगता पोलंडला पोहोचला. जेव्हा वेरोनिकाने त्याला विचारले की तो अचानक का आला? त्यावेळी सुरुवातीला तो शांतच बसला, मग नंतर त्याने तिच्याबद्दलच्या भावना बोलून दाखवल्या. या एका घटनेनंतर त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली.

पोलंडमध्ये कोर्ट मॅरेज

दोघे रिलेशनशिपमध्ये (Relationship) आल्यानंतर वेरोनिका आपल्या कुटुंबासह भारतात आली होती. यावेळी ईशानने तिच्या कुटूंबियांना  भारतातील अनेक मोठ्या शहरात फिरवले. या दरम्यान वेरोनिका अनेकदा भारतात येत राहिली,तर इशान पोलंडला जात राहिला. सुमारे दीड वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर तो पोलंडमध्ये स्थायिक झाला होता. यानंतर ईशानने वेरोनिकाला लग्नाची मागणी घातली होती. या त्याच्या मागणीला वेरोनिकाने होकार कळवत पोलंडमध्ये कोर्ट मॅरेज (Court Marriage)केले. 

दरम्यान ईशानने त्याची ही संपूर्ण लव्ह स्टोरी (Love Story)त्याच्या एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये सांगितली आहे. त्याच्यासोबत वेरोनिका देखील आहे.  पॅरिसमधील आयफेल टॉवरसमोर बसून या जोडप्याने संपुर्ण जगाला त्यांची लव्हस्टोरी सांगितली आहे. ईशान गोयल सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. यूट्यूबवर त्यांचे 7 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. त्याचवेळी इन्स्टाग्रामवर 1 लाखांहून अधिक लोक त्याला फॉलो करतात. सध्या त्याच्या लव्ह स्टोरीची सोशल मीडियावर (Social media) चर्चा आहे.