इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाकिस्तानी सर्वोच्च न्यायायालनं जोरदार दणका दिलाय. पनामा गेट प्रकरणी झालेल्या सुनावणीत आज सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयात शरीफ यांना पंतप्रधानपदासाठी अयोग्य ठरवलंय. त्यानंतर नवाझ शरीफ यांनी पदाचा राजीनामा दिलाय.
त्यांच्या जागी शाहीद अब्बासी पाकिस्तानचे पंतप्रधान होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठानं एकमतानं हा निर्णय दिला. नवाज शरीफ यांनी पाकिस्तानी संसद आणि कोर्ट या दोघ ठिकाणी खोटेपणा केलाय. त्यामुळे त्यांना पंतप्रधानपदी अयोग्य ठरवण्यात येत आहे, असं या कोर्टानं म्हटलंय.
पाकिस्तानाचे अर्थमंत्री इशक दार आणि राष्ट्रीय असेंबलीचे सदस्य कॅप्टन सफदर यांनाही अयोग्य ठरवण्यात आलंय. त्यामुळे या सर्वांना पदावरून दूर व्हावं लागंलय.. त्याचबरोबर नवाज शरीफ यांची दोन मुलं आणि त्यांची मुलगी मयरम यांच्याविरोधातही खटले भरावेत असेही आदेश सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय.