Sex टीचरचं भलतंच असायमेंट, विद्यार्थी एकूणचं चक्रावले

पालकांना आक्रोश करावा लागला असं नेमकं सेक्स टीचरन काय असायमेंट दिलं होत? वाचा संपुर्ण बातमी 

Updated: Aug 27, 2022, 07:23 PM IST
Sex टीचरचं भलतंच असायमेंट, विद्यार्थी एकूणचं चक्रावले  title=

मुंबई : शिक्षक हे विद्यार्थ्याचे दुसरे पालक असतात. या शिक्षकांना गुरूंचाही दर्जा दिला जातो. मात्र या घटनेत शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी 
घटना घडलीय. ही घटना घडल्यानंतर मोठा गदारोळ झाला. पालंकाच्या रोषानंतर या घटनेतील टीचरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे नेमकं या घटनेत टीचरने असं काय केलंय, ज्यामुळे तिला शाळेतून काढून टाकण्यात आलं ते जाणून घेऊय़ात. 

सेक्स टीचर शाळेतील विद्यार्थ्यांना सेक्स एज्यूकेशन शिकवायची. सेक्स संदर्भातील अनेक गैरसमज आणि समज ती या विद्यार्थ्यांना तिच्या वर्गात शिकवण्याचे काम करायची. एके दिवशी सेक्स टीचरने विद्यार्थ्यांना एक भलतंच असायमेटं दिले. हे असायमेट एकूण विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला होता. 

काय होत असायमेंट?
सेक्स टीचरने आपल्या विद्यार्थ्यांना भलतंच असायमेंट दिले होते. या असायमेंटमध्ये विद्यार्थ्यांना स्पर्मने भरलेला कंडोम आणण्याचे असायमेंट दिले गेले होते. हे असायमेंट एकूण विद्यार्थी चक्रावले होते. नेमकं हे असायमेटं कसं पुर्ण करावं असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर होता.  

पालकांचा आक्रोश 
विद्यार्थ्यांच्या पालकांना अशा विचित्र असायमेंटची माहिती मिळाली, तेव्हा त्यांना देखील याचा मोठा धक्का बसला. दरम्यान या घटनेनंतर पालंकानी सेक्स टीचरच्या या असायमेंटचा विरोध केला. तसेच तिला शाळेतून निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. पालकांच्या आक्रोशापुढे शाळा प्रशासनालाही नमते घ्यावी लागली. त्यानंतर शाळा प्रशासनाने सेक्स टीचरला निलंबित केले. 

टीचर निलंबित 
बोल्वियाच्या ज्यूना अझूरद्यू दे पेडिला या शाळेतली ही घटना आहे. या घटनेनंतर सेक्स टीचर मारीया पेरेडोव्होला शाळेतून निलंबित करण्यात आले आहे. तसेच तिच्यावर आता कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.  

टीचरंच काय म्हणण आहे ?
टीचर मारीया या असायमेंटवर म्हणाल्या की, असं असायमेटं करणे विद्यार्थ्यांना कम्पलसरी नव्हते.त्यांची इच्छा असेल तरच त्यांनी करावे असे मी सांगितले होते.तसेच हे अल्पवयीन मुलांचा छळ करण्याच्या श्रेणीत येते याची तिला कल्पना नव्हती. तसेच स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले, तिला स्वतःची चार मुले आहेत. अशा परिस्थितीत ती इतर मुलांवर अत्याचार करण्याचा विचारही करू शकत नाही,असे स्पष्टीकरण तिने दिले आहे. 

दरम्यान आता या टीचर मारियाला शाळेतून निलंबित करण्यात आले आहे.त्यामुळे आता पालकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.