मुंबई : काही जण पैसा कमवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत असतात. पण जगात असे लोकं देखील आहेत ज्यांनी आपली अनेक संपत्ती दान केली आहे. असे दानशूर लोकं जगात खूप कमी असतात. पॅटागोनिया या प्रसिद्ध कंपनीच्या संस्थापकाने देखील असंच काही केलं आहे. त्यांनी कंपनीला अब्जावधी रुपयांची देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरणाचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे कंपनीच्या मालकाने सांगितले. यापूर्वीही त्यांनी पर्यावरणविषयक कामांमध्ये सक्रियता दाखवली आहे. आता कंपनीला जो नफा मिळेल, तो पैसा हवामान संकटाशी लढण्यासाठी खर्च केला जाईल. असं त्यांनी म्हटलं.
83 वर्षीय व्यावसायिकाने कंपनीला 23,922 कोटी रुपये दान करण्याचा निर्णय घेतला आहे. पॅटागोनिया कंपनीचे संस्थापक Yvon Chouinard यांनी नुकतीच ही मोठी घोषणा केली आहे. Yvon Chouinard म्हणाले, 'आता फक्त पृथ्वी हा त्याच्या कंपनीचा एकमेव भागधारक आहे.'
'द इंडिपेंडंट'च्या वृत्तानुसार, कंपनीला जो काही नफा होईल तो पर्यावरणीय समस्या आणि हवामान संकटावर खर्च केला जाईल. संस्थापक Yvon Chouinard आणि त्यांच्या कुटुंबाने पर्यावरण आणि हवामान संकटाच्या कारणासाठी कंपनीला देणगी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
पॅटागोनिया ही अमेरिकेतील प्रसिद्ध कपड्यांची कंपनी आहे. कंपनी कपडे, कॅम्पिंग गियर आणि इतर वस्तू तयार करते. परंतु, या उत्पादनांमधून जो काही फायदा होईल, तो हवामान संकटाशी लढण्यासाठी वापरला जाईल. कंपनीच्या वेबसाइटवरही याबाबत माहिती देण्यात आली आहे. Yvon Chouinard यांनी वेबसाइटवर एक खुले पत्र लिहिले आहे.
Yvon Chouinard आता 83 वर्षांचे आहे, ते एक गिर्यारोहक आहेत. सुमारे 50 वर्षांपूर्वी त्यांनी व्हेंचुरा (कॅलिफोर्निया) येथे पॅटागोनियाची स्थापना केली. तेव्हापासून ही कंपनी कोट्यवधी रुपयांची उलाढाल करते. Yvon Chouinard यांनी सांगितले की, त्यांना कधीच व्यापारी व्हायचे नव्हते. त्यांनी एक कारागीर म्हणून सुरुवात केली आणि त्यांच्या मित्रांसाठी आणि स्वतःसाठी गिर्यारोहणाशी संबंधित गोष्टी बनवल्या. त्यानंतर ते या व्यवसायात आले.
2018 मध्ये, कंपनीने कर कपात म्हणून कंपनीला मिळालेली रक्कम दान करण्याचा निर्णय घेतला होता.